माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मुद्रित आणि इलेक्ट्रोनिक माध्यमांसाठी मार्गदर्शक सूचना
प्रविष्टि तिथि:
22 APR 2020 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2020
प्रसार माध्यमात काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामामुळे कोविड-19 ची लागण झाल्याच्या देशाच्या विविध भागातून झालेल्या घटनाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मुद्रित आणि इलेक्ट्रोनिक माध्यमांसाठी आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
देशाच्या विविध भागात कोविड-19 संदर्भात घटनांचे वार्तांकन करण्यासाठी, प्रतिबंधित क्षेत्र, हॉटस्पॉट तसेच कोविडग्र्स्त इतर भागात जाणाऱ्या किंवा इतर भागात प्रवास करणाऱ्या वार्ताहर, कॅमेरामन,फोटोग्राफर यांच्यासह माध्यमकर्मीनी, आपले कर्तव्य बजावताना आरोग्याची आणि संबंधित इतर खबरदारी घ्यावी. माध्यम समूहांनी कार्यालयीन आणि प्रत्यक्ष घटना स्थळी जाणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांची आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या लिंकवर संपूर्ण मार्गदर्शक सूचना वाचता येतील-
https://mib.gov.in/sites/default/files/Advisory%20to%20Print%20and%20Electronic%20Media.pdf
* * *
G.Chippalkatti/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1617071)
आगंतुक पटल : 295
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam