आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती
Posted On:
21 APR 2020 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2020
कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.
राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असेल, याची व्यवस्था करावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. विशेषतः थँलेसेमिया सिकल सेल, ॲनिमिया आणि हिमोफेलीया अशा आजारांचे रुग्ण ज्यांना वारंवार रक्ताची गरज लागते, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जावी, असे त्यांनी म्हंटले आहे. प्रत्येक रक्तगटाचा किती साठा उपलब्ध आहे, याची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यासाठी आणि साठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी, “इ-रक्तकोश” या ऑनलाईन पोर्टलचा वापर केला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
कोविड-19 व्यवस्थापनात सहकार्य करण्यासाठी इंडियन रेड क्रॉसने रक्तपुरवठा सेवेसाठी दिल्लीत एक 24X7 नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. त्याचे क्रमांक: 011-23359379, 93199 82104, 93199 82105.असे आहेत.
अधिकारप्राप्त समिती-4 कडे मनुष्यबळ आणि क्षमता बांधणीत वाढ करण्याची जबबदारी देण्यात आली होती, त्यांनी कोविडयोद्धे (COVID WARRIORS) डॅशबोर्ड विकसित केला आहे. यावर, मनुष्यबळ विषयक 20 श्रेणींमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे, तर 49 उपश्रेणी आहेत. यात, एमबीबीएस डॉक्टर्स, आयुष डॉक्टर्स, परिचारिका, अन्य कर्मचारी,आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविका, केंद्र सरकारच्या विविध योजना, जसे PMKVY, DDU GKY, DAY–NULM, अंतर्गत प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र अशा योजनांचे स्वयंसेवक, निवृत्त अधिकारी यांचा समावेश आहे. सध्या आपल्याकडे 1.24 कोटी मनुष्यबळ उपलब्ध असून नवनव्या गटांमुळे या संख्येत वाढ होत आहे. या डॅशबोर्डवर मनुष्यबळाची राज्य आणि जिल्हावार माहिती उपलब्ध असून, संबंधित राज्ये आणि जिल्ह्यांच्या नोडेल अधिकाऱ्यांची नवे आणि संपर्कही आहेत.
या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही उपकरणावर(मोबाईल/laptop/ कॉम्पुटर)वापरता येईल अशी प्रशिक्षण साधने आणि माहिती उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर 14 अभ्यासक्रम असून 53 मोड्यूल आहेत त्यात 113 व्हिडीओ आणि 29 कागदपत्रे आहेत.
आतापर्यंत,14,995 आयुष व्यावासायिकांची 15 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात नेमणूक झाली आहे. तर 3492 एनसीसी कॅडेट्स आणि 553 NCC कर्मचारी यांची 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशात 68 जिल्ह्यात नेमणूक करण्यात आली आहे. 47,000 पेक्षा जास्त कॅडेट्सनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. त्याशिवाय, 1,80,000 निवृत्त लष्करी अधिकारी देखील सेवेसाठी तयार आहेत. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे 40,000 पेक्षा स्वयंसेवक 550 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये सेवाकार्य करत आहेत. कोविडशी संबंधित सर्व कामात सरकार आणि प्रशासनासोबत नेहरू सेवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे 27 लाख स्वयंसेवक विविध राज्यांत काम करत आहेत.
काही रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याच्या घटनामुळे रुग्णालये बंद करावी लागण्याच्या पार्श्वभूमीवर, तसेच, कोविडशी संबंध नसलेल्या काही रूग्णांना वेगवगेळ्या रुग्णालयात भारती केले असता, त्यांच्यापैकी काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यावर, आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे आपण या संकेतस्थळावर बघू शकता
https://www.mohfw.gov.in/pdf/GuidelinestobefollowedondetectionofsuspectorconfirmedCOVID19case.pdf
रुग्णालयांमध्ये अशा घटनांवर देखदेख ठेवण्याची जबाबदारी रुग्णालय संसर्ग नियंत्रण समितीकडे देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण याविषयी माहिती देण्याचे काम या समितीकडे असेल. त्यासाठी खालील नियमावलीचे पालन करायचे आहे :
- या रुग्णाविषयी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती द्या आणि या रुग्णाला कोविडच्या उपचारांसाठी अलगीकरण कक्षात हलवण्यात यावे.
- अशा रूग्णां नी मास्क लावावेत आणि केवळ समर्पित आरोग्य कर्मचाऱ्यांनीच त्यांच्यावर उपचार करावेत, तेही सर्व काळजी घेऊनच.
- त्यांच्या वैद्यकीय स्थितीनुसार, त्या रुग्णाला पूर्ण खबरदारी घेऊन कोविड समर्पित रुग्णालयात दाखल केले जावे.
- तो रुग्ण जिथे होता, त्या संपूर्ण व्यवस्थेचे निर्जंतुकीकरण केले जावे.
- हा रुग्ण ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला असेल, त्या सगळ्यांचे त्वरित विलगीकरण केले जावे.
- त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व जवळच्या व्यक्तींना सात दिवस HCQ औषधाचा डोज दिला जावा.
कोविड19 च्या रुग्णांमधील मृत्यूदर कमी करण्यासाठी एका औषधाच्या क्षमतेची सलग, सरसकट चाचणी (क्लिनिकल ट्रायल) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) करणार आहे. कोविड19 चे रुग्ण आणि ग्राम निगेटिव्ह सेप्सिसच्या रूग्णांमधील लक्षणांमध्ये आढळणारे साम्य लक्षात घेऊन भारतीय औषध महानियंत्रकानी ही चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. लवकरच विविध रुग्णालयांमध्ये ही चाचणी सुरु केली जाईल.
कोविड-19 शी संबंधित विविध संशोधनांसाठी, जैवतंत्रज्ञान विभागाने अर्ज मागवले आहेत. त्यासाठी खालील गोष्टींसाठी बहुआयामी दृष्टीकोन ठेवला जात आहे.
वेगवगेळ्या ठिकाणी आणि वेगवगेळ्या स्तरावर लस विकसित करणाऱ्या सर्व संशोधकांना नॅशनल बायोफार्मा मिशन अंतर्गत एकत्र आणून या कामाला गती देणे.
लसीवर संशोधन करणाऱ्या आणि कोरोनाच्या लसीवर संशोधन करणाऱ्याना निधीचे पाठबळ देणे.
- कोविड साठी DNA लस विकसित करण्याच्या संशोधनाला पाठबळ दिले जात आहे.
- मौलीक्युलर आणि रेपिड निदान किट्सची भारतात निर्मिती करण्यासाठी देखील प्रोत्साहन दिले जात आहे.
चार जिल्हे, पुद्दुचेरीचा माहे, कर्नाटकातील कोदाग्गु आणि उत्तराखंड मधील पौरी गढवाल आणि राजस्थानचा प्रतापगड या ठिकाणी गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यात चार नव्या जिल्ह्यांची नोंद झाली असून 23 राज्ये/केंद्रशासित प्रदेश मिळून आता असे 61 जिल्हे झाले आहेत. यादीत भर पडलेले चारही जिल्हे महाराष्ट्रातील असून त्यांची नावे खालीलप्रमाणे:
लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशीम
आतापर्यंत देशात कोविड-19 चे 18,601 रुग्ण झाले आहेत. 3252 जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली असून एकूण रूग्णांपैकी बरे होण्याचे प्रमाण 17.48% इतके आहे. आतापर्यंत कोविडमुळे देशात 590 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1616855)
Visitor Counter : 248
Read this release in:
English
,
Odia
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam