Posted On:
20 APR 2020 5:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2020
कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आज म्हणजेच 20 एप्रिल 2020 रोजी सरकारी कार्यालयांच्या कामांविषयी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व अधिकारी आणि कर्मचारयांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीची सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
· कापडाने चेहरा झाका
· निर्जंतुकीकरणाच्या प्रोटोकॉलचे कठोर पालन करा.
· साबण आणि पाण्याने हात वारंवार धुवा किंवा अल्कोहोल आधारित हैंड रब/सैनिटायझर वापरा.
· एकमेकांमध्ये पुरेसे शारीरिक अंतर ठेवा.
· पाचपेक्षा अधिक लोक एकत्र जमु नका.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण मोजले असता, त्यावरून असा निष्कर्ष निघतो की, लॉकडाऊनच्या आधी कोरोनारुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण 3.4 दिवस होते जे आता म्हणजेच 19 एप्रिलला 7.5 दिवस एवढे झाले आहे. देशातल्या या रुग्णसंख्या दुपटीच्या सरासरी दराच्या तुलनेत 18 राज्यांचा दर अधिक चांगला आहे.
दुपटीचा दर 20 दिवसांपेक्षा कमी असलेली राज्ये -
o दिल्ली (UT)- 8.5 दिवस
o कर्नाटक - 9.2 दिवस
o तेलंगणा- 9.4 दिवस
o आंध्र प्रदेश- 10.6 दिवस
o जम्मू काश्मीर(UT)- 11.5 दिवस
o पंजाब- 13.1 दिवस
o छत्तीसगढ - 13.3 दिवस
o तामिळनाडू - 14 दि
o बिहार- 16.4 दिवस
20 ते 30 दिवसांत दुप्पट होण्याचे प्रमाण
o अंदमान निकोबार (UT) - 20.1 दिवस
o हरयाणा - 21 दिवस
o हिमाचलप्रदेश-24.5 दिवस
o चंदिगढ (UT)- 25.4 दिवस
o आसाम - 25.8 दिवस
o उत्तराखंड- 26.6 दिवस
o लदाख (UT) - 26.6 दिवस
30 दिवसांपेक्षा अधिक दुपटीचा काळ असलेली राज्ये :
o ओडिशा - 39.8 दिवस
o केरळ - 72.2 दिवस
गोवा राज्यातील कोविड19 च्या सर्व रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून आता गोव्यात कोविडचा एकही रुग्ण नाही. तीन जिल्हे, पुद्दुचेरीतील माहे, कर्नाटकातील कोदाग्गु आणि उत्तराखंड मधील पौडी गढवाल या ठिकाणी गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यात सहा नव्या जिल्ह्यांची नोंद झाली असून 23 राज्ये/केंद्रशासित प्रदेश मिळून आता असे 59 जिल्हे झाले आहेत. यादीत भर पडलेले सहा जिल्हे खालीलप्रमाणे :
· डुंगरपूर आणि पाली-राजस्थान
· जामनगर आणि मोरबी –गुजरात
· उत्तर गोवा-गोवा
· गोमती-त्रिपुरा
आतापर्यंत देशात कोविड-19 चे 17,265 रुग्ण झाले आहेत. 2547 जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली असून एकूण रूग्णांपैकी बरे होण्याचे प्रमाण 14.75 % इतके आहे. आतापर्यंत कोविडमुळे देशात 543 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor