विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 वर  संशोधनासाठी जैवतंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद प्रयत्नशील

Posted On: 20 APR 2020 2:37AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2020

 

जैवतंत्रज्ञान विभाग(DBT) आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेने(BIRAC) कोविड-19 वर परस्पर सहकार्याने संशोधन करण्यासाठी अर्ज मागवले होते. या प्रक्रियेचा पहिला टप्पा 30 मार्च 2020 रोजी समाप्त झाला आणि यासाठी विविध उद्योग आणि शैक्षणिक संस्थांकडून सुमारे 500 अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची बहुस्तरीय छाननी प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत उपकरणे, निदान, लसींचे घटक, औषधोपचारशास्त्र आणि इतर उपाययोजनांसंदर्भातल्या 16 प्रस्तावांना निधी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. विविध प्लॅटफॉर्मवर तयार होणारे लसींचे घटक आणि विकासाच्या विविध टप्प्यांवर असलेले संशोधन यांना या परस्पर पूरक संशोधन प्रक्रियेद्वारे गती देण्यासाठी नॅशनल बायोफार्मा मिशन कडून निधी मिळवून देण्यासाठी स्वीकारलेला हा बहुआयामी दृष्टीकोन आहे. या अंतर्गत प्रस्तावांची निवड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या लसींच्या घटकांचा अतिजोखीम असलेल्या गटांना तातडीने संरक्षण पुरवण्यासाठी नव्याने वापर करणे आणि नॉव्हेल लसीच्या घटकांचा विकास करणे या दोन्हींचा विचार करण्यात आला. नॉव्हेल कोरोना विषाणू सार्स-कोव्ह 2 या विषाणूप्रतिबंधासाठी डीएनए लसीचे घटक विकसित करण्यासाठी कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडला निष्क्रिय करण्यात आलेल्या रेबीज व्हेक्टर प्लॅटफॉर्मचा वापर करून कोविड-19 लसीकरणाचे घटक तयार करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावांना निधी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याशिवाय उच्च जोखीम असलेल्या लोकसंख्येंतर्गत वापर करण्याची योजना असलेल्या नव्याने तयार करण्यात आलेल्या बीसीजी लसीच्या मानवी  वैद्यकीय चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ला पाठबळ पुरवले जाणार आहे. सार्स कोव्ह-2 लस विकसित करण्याच्या प्रक्रियेला पाठबळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीमध्ये नॉव्हेल वॅक्सीन इव्हॅल्युएशन प्लॅटफ़ॉर्म विकसित करण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची मंजुरी देखील देण्यात आली आहे.  कोविड-19 च्या बऱ्या झालेल्या रुग्णांच्या स्रावाचा वापर करून प्युरिफाईड इम्युनोग्लोब्युलिन G, IgGचे उत्पादन आणि इक्विन हायपर इम्युन ग्लोब्युलिनचे उत्पादन करण्यासाठी व्हर्चो बायोटेकचे पाठबळ उपलब्ध होणार आहे.  इन व्हिट्रो लंग ऑर्गनॉईड मॉडेल तयार करण्यासाठी ऑन्कोसीक बायो प्रा लिमिटेडला आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. स्वदेशी बनावटीच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि मॉलिक्युलर आणि रॅपिड निदान चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी खालील कंपन्यांना आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे.

मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रा. लि, हुवेई लाईफसायन्सेज, उबियो बायोटेक्नॉलॉजी सिस्टम्स लि., धुती लाईफ सायन्सेज प्रा. लि., मॅगजिनोम टेक्नॉलॉजीज प्रा. लि., बिगटेक प्रा लि आणि याथुम बायोटेक प्रा. लि या त्या कंपन्या आहेत.

विविध उत्पादकांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी आंध्र प्रदेश मेडटेक झोनमध्ये नॅशनल बायोफार्मा मिशन अंतर्गत निदान करण्याचे किट्स आणि व्हेटिलेटर्सचे उत्पादन करण्यासाठी सामाईक सुविधा उभारण्यात येणार आहे.

कोविड-19च्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी संपर्कविरहित परवडण्याजोगे थर्मोपाईल आधारित अल्ट्रासोनिक सेन्सर्सचा विकास आणि वापर करण्यासाठी आणि नॉव्हेल पीपीई किट्स उत्पादनासाठी देखील पाठबळ देण्यात येणार आहे.

 

U.Ujgare/S.Patil/P.Kor



(Release ID: 1616334) Visitor Counter : 298