आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातली ताजी स्थिती

Posted On: 19 APR 2020 7:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 एप्रिल 2020


कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे. 

औषधांची आणि लसीची चाचणी करण्यासाठी विज्ञानक्षेत्रात विशेष काम करण्यासाठी एक उच्चस्तरीय कृतीदलाची स्थापना करण्यात आली आहे. नीती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य आणि पंतप्रधानांचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार या कृतीदलाचे सहअध्यक्ष आहेत. त्याशिवाय, आयुष, आयसीएमआर, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, जैवतंत्रज्ञान, सीएसआयआर, डीआरडीओ, आरोग्य सेवा विभागाचे महासंचालनालय आणि भारतीय औषधे नियंत्रक महासंचालनालय या सर्व विभागांचे प्रतिनिधी या उच्चस्तरीय कृतीगटाचे सदस्य आहेत.

सर्व मंत्रालयांनी लस विकसित करण्याबाबत केलेल्या प्रयत्नांमध्ये समन्वय राखून, या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे संशोधनाच्या कामाला गती मिळेल, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या संशोधनाशी समन्वय राखता येईल. तसेच, लस विकसित करण्याच्या कामात, जैवतंत्रज्ञान विभाग एक नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे. या कृतीदलाद्वारे, केंद्र सरकार, लस विकसित करण्याच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांच्या प्रगतीवर देखरेख ठेवू शकेल. या कृती दलाचा मुख्य भर, वैद्यकीय सामुहिक प्रयत्नांवर असेल, ज्याद्वारे, आजाराविषयीची माहिती आणि व्यवस्थापन या क्षेत्रातल्या तज्ञांना दीर्घकाळ एकत्रित काम करता येईल.

20 एप्रिल 2020 पासून ज्या भागात विषाणूचा जास्त प्रादुर्भाव झालेला नाही, तिथे लॉकडाऊनचे काही निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. मात्र हॉटस्पॉट असलेल्या परीबंधित जिल्ह्यात, काहीही शिथिलता दिली जाणार नाही. स्थानिक परिस्थितीनुसार, गरज पडल्यास, राज्ये/केंद्रशासित प्रदेश अतिरिक्त उपाययोजना करु शकतात. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार, निश्चित करण्यात आलेली कंटेनमेंट (प्रतिबंधीत) क्षेत्रे खालीलप्रमाणे:-

  • हॉटस्पॉट म्हणजे असे भाग जिथे कोविड-19 चा मोठा संसर्ग किंवा व्यापक प्रादुर्भावाचा क्लस्टर निर्माण झाला आहे.  
  • जिथे अधिक रुग्ण आहेत आणि जिथे रुग्णांची संख्या 4 दिवसांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट होत आहे.

हॉटस्पॉटमध्ये, स्थानिक प्रशासन कंटेनमेंट क्षेत्र आणि बफर झोन निश्चित करुन आजार नियंत्रित करतात.

या कंटेनमेंट क्षेत्रात, जीवनावश्यक सेवा वगळता कुठल्याही कामांसाठी परवानगी दिली जाणार नाही. असे भाग जिथे, काही शिथिलता देण्यात आली आहे, तिथे, सध्या असलेल्या लॉकडाऊन नियमांचे कठोरपणे पालन केले जाईल याची दक्षता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी घ्यायची आहे. तसेच सामाजिक नियमांचे पालन सर्व कार्यालये, कामाच्या जागा, कारखाने आणि आस्थापनांमध्ये केले जात आहे, याचीही काळजी घ्यायची आहे.  

जर अशा भागांमध्ये रुग्ण आढळले तर, या जागा पुन्हा रेड झोनमध्ये येऊ शकतात. कंटेनमेंट क्षेत्रांनीही लॉकडाऊनची अंमलबजावणी करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे.

सध्या देशभरात कोविड-19 साठी 2144 रुग्णालये आहेत. यात 755 समर्पित रुग्णालये तर 1389 कोविड हेल्थ सेन्टर्स आहेत.

आतापर्यंत देशात कोविडच्या रुग्णांची एकून संख्या 15,712 इतकी झाली आहे. तर, 2231 रुग्ण म्हणजेच 14.19% टक्के रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

पुद्दुचेरीच्या माहे आणि कर्नाटकच्या कोडगु जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही. 23 राज्यातल्या 54 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. 

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in 

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

 

 

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane



(Release ID: 1616135) Visitor Counter : 153