अर्थ मंत्रालय

कोविड-19 परिस्थितीत जीएसटी करदात्यांच्या मदतीसाठी कटीबद्ध- सीबीआयसी

Posted On: 17 APR 2020 11:26PM by PIB Mumbai

                

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020

 

कोविड-19 परिस्थितीत करदात्यांच्या मदतीसाठी कटीबद्ध असल्याचं केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क (CBIC) मंडळानं म्हटलं आहे.

30 मार्च 2020 पासून सीबीआयसीनं 12,923 परताव्यांचे अर्ज प्रक्रियाकृत केलेत   ज्यामध्ये 5,575 कोटी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा केला आहे, तसेच गेल्या आठवड्यात सीबीआयसीनं 3854 कोटी रुपयांचे 7,873 दाव्यांच्यां निपटाऱ्याचा समावेश आहे.

व्यापार आणि उद्योगस्नेही उपाययोजना करत सीबीआयसीने  31.03.2020 रोजीच्या परिपत्रकाद्वारे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) धारकांना दिलासा दिला आहे. जीएसटी धारकांना समाजमाध्यम आणि इतर माध्यमांमधून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या परताव्यामुळे नूकसान होऊ नये यासाठी योग्य माहितीशिवाय आयटीसी परताव्यांची प्रक्रिया केली नाही.

14 मार्च रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या 39 व्या बैठकीत घेतलेल्या उपाययोजनांनूसार चुकीच्या आयटीसी दाव्यांवर प्रक्रिया केली नाही.

चुकीच्या दाव्यांमुळे परताव्याला उशीर लागू नये म्हणून अर्जासोबतच वर्गीकरण कोड जाहीर करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारच्या सर्व अर्जांची मुदत 31 मार्च होती, ती वाढवून 30 जून 2020 करण्यात आली आहे.

 

B.Gokhale/S.Thakur/P.Kor



(Release ID: 1615570) Visitor Counter : 234