संरक्षण मंत्रालय

लष्करी कर्मचाऱ्यांना सैनिकी मोर्चाच्या ठिकाणी घेऊन जाणारी विशेष ट्रेन रवाना

Posted On: 17 APR 2020 8:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020

 

बंगळूरू, बेळगाव आणि सिकंदराबाद येथील लष्करी प्रशिक्षण आस्थापनांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले आणि उत्तर भारतातील परिचालन क्षेत्रात तैनात असणाऱ्या तुकड्यांमध्ये पुन्हा सामील होण्यासाठी आज (17 एप्रिल) सुमारे 950 लष्करी कर्मचाऱ्यांना घेऊन एक विशेष ट्रेन बंगळूरू हून रवाना झाली. या सर्व कर्मचाऱ्यांनी बंधनकारक असलेला विलगीकरण कालवधी पूर्ण केला असून ते सर्व वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त आहेत.

कोविड-19 व्यवस्थापनाचा भाग म्हणून शक्यतो सर्व खबरदारी घेताना सॅनिटायझेशन बोगद्याची स्थापना करण्याव्यतिरिक्त रेल्वे फलाट, रेल्वेचे डब्बे आणि सामानाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.  प्रवेश आणि तपासणी करतांना सामाजिक अंतराचे पालन केले गेले.

देशाच्या ईशान्य भागात तैनात असणाऱ्या तुकडीमध्ये सामील होण्यासाठी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारी दुसरी ट्रेन नंतर रवाना करण्यात येणार आहे.

 

कर्नल अमन आनंद,पीआरओ (सेना)

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor



(Release ID: 1615488) Visitor Counter : 180