आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातली ताजी स्थिती

Posted On: 17 APR 2020 7:55PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

कोविड-19 संदर्भातली परिस्थिती हाताळण्यासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिगटाची बारावी बैठक आज नवी दिल्लीत निर्माण भवन येथे झाली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचे परिणाम आणि त्यासंदर्भातला आराखडा बनवण्याबाबत विस्तृत चर्चा झाली. कोविड-19 चे निदान, लस, औषधे आणि रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे आणि एकूण आरोग्यसुविधा, या सर्व मुद्द्यांबाबत संदर्भात विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांच्या कामांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, जैव तंत्रज्ञान विभाग, सीएसआयआर, आयसीएम आर , अणुउर्जा विभाग आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय विविध विषयांवर एकत्रित काम करत आहेत: --

· नव्या रापिड आणि अचूक निदान चाचण्यांच्या किट्स तयार करणे, ज्यातून30 मिनिटांत निदान होऊ शकेल.

· त्यांच्या 30 प्रयोगशाळांमार्फत चाचण्यांची क्षमता वाढवणे

· अभिनव एकत्चा समग्र चाचणी धोरण विकसित करणे, ज्याद्वारे अधिकाधिक लोकांची चाचणी होऊ शकेल.

· ज्या दुर्मिळ घटकांमुळे देशांतर्गत चाचण्या किट्स बनवण्याच्या कामात मर्यादा येत आहेत, अशा घटकांचे भारतीय सिंथेसिस विकसित करणे.

· विषाणूच्या डीएनए चा सिक्वेन्स वाढवणे, ज्यामुळे संसर्गजन्य आजार अध्ययनशास्त्राला मदत मिळेल आणि संभाव्य म्युटेशन ची शक्यता तपासता येईल.

निष्क्रिय विषाणू, प्रतीरोधके, किंवा अँटी-जीन्स मोनोक्लोनल, आरएनए आधारित अध्ययनातून लस विकसित करणे आणि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ती विकसित करणे या कामाचा आढावा घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या एकत्रित चाचण्यांच्या अध्ययनात भारत भागीदार असून, त्याच्यामार्फत, या थेरपीचा प्रभाव निश्चित केला जात आहे. वैज्ञानिक कृती दले, सध्या अस्तित्वात असलेल्या औषधांचे मूल्यमापन करत आहेत आणि कोविड-19 वर उपचारांसाठी त्याचा काही उपयोग होतो का, याचा अभ्यास करत आहेत. CSIR ने विषाणू-रोधी मोलेक्युल्सचे भारतीय सिंथेसिस विकसित करण्यात प्रगती केली आहे. पारंपारिक वैद्यकीय व्यवस्था आणि आयुष मंत्रालयाच्या संशोधनांचा समांतर अभ्यासही केला जातो आहे.

त्यासोबतच, दुय्यम सहायक उपकरणे आणि साधने, जसे वैयक्तिक संरक्षण उपकरणे, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटीलेटर्स, या सगळ्याच्या उत्पादन आणि पुरवठ्यासाठी CSIR सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या SCTIMST संस्थेसोबत काम करत आहे. भारतात RT-PCR किट्स से उत्पादन सुरु झाले असून मे 2020 पासून दर महिना 10 लाख किट्स तयार केल्या जाऊ शकतील. मे महिन्यापासूनच, रेपिड अंॅटी बॉडी डिटेक्शन किट्स देखील तयार केल्या जाणार असून दर महिन्यात अशा 10 लाख किट्स तयार होणार आहेत. ज्या जिल्ह्यात अधिक रुग्णसंख्या आहे, अशा सर्व जिल्ह्यात 5 लाख रेपिड अँटी बॉडी टेस्ट किट्स वितरीत करण्यात आल्या आहेत. सध्या भारतात व्हेंटीलेटर बनवण्याची क्षमता प्रती महिना 6000 व्हेंटीलेटर इतकी आहे. निदान, उपचार आणि लस अशा तिन्ही क्षेत्रात युद्धपातळीवर सुरु असलेल्या प्रयत्नांवर आरोग्य मंत्रालय सातत्याने देखरेख ठेवून आहे.

त्याशिवाय, आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये/जिल्ह्यांना कोरोनाच्या रुग्णांचे अनुमान करणारी उपकरणे दिली आहेत, ज्यांचा आधार घेऊन, प्रशासन कोरोनाविरुद्धच्या लढाईत आधी सज्जता ठेवू शकेल.

सध्या देशभरात एकूण 1919 समर्पित COVID-19 रुग्णालये असून ज्यात, केंद्र आणि राज्य दोन्हीमधल्या रुग्णालयांचा समावेश आहे. यात :-

· 672 समर्पित COVID रुग्णालये (DCH) (एकूण107830 अलगीकरण बेड्स आणि 14742 आयसीयु बेड्सची व्यवस्था),

· 1247 समर्पित COVID आरोग्य केंद्रे (DCHC) (एकूण 65916 अलगीकरण बेड्स आणि 7064 आयसीयु बेड्सची व्यवस्था),

· एकूण 1919 सुविधा ज्यात एकूण 1,73,746 अलगीकरण बेड्स आणि एकूण 21,806 आयसीयु बेड्स उपलब्ध.

· पूर्वी भारताचा रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी म्हणजेच दर 3 दिवस होता, मात्र गेल्या सात दिवसांपासून हा दर 6.2 इतका झाला आहे. 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात रुग्णसंख्या दुपटीचा दर देशाच्या सरासरी दरापेक्षा कमी आहे. याचा अर्थ या भागात रुग्णसंख्या वाढीचा दर, थोडा कमी झाला आहे.

15 मार्च ते 31 मार्च या कालावधीत, 2.1 असलेला सरासरी वाढीचा दर एक एप्रिल 2020 पासून 1.2 इतका आहे, हे पाहिल्यास, यात सुमारे 40% घट झाल्याचे लक्षात येईल.

कालपासून देशात कोरोनाचे 1007 नवे रुग्ण वाढले असून, 23 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे एकूण 13,387 रुग्ण असून 1749 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

 

G.Chippalkatti/R.Aghor /P.Kor



(Release ID: 1615462) Visitor Counter : 178