आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती
Posted On:
16 APR 2020 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2020
कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालण्याबाबत सुरु असलेल्या उपाययोजनांसंदर्भात, आरोग्य अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे देखील उपस्थित होते.
जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी जिल्हापातळीवर काम करत असून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अधिकाऱ्यांसोबत कोविड-19 च्या संसर्गाचे क्लस्टर्स आणि अधिक प्रसार असलेल्या भागात सूक्ष्म पातळीवर नियोजनासाठी तांत्रिक आणि इतर सहकार्यासाठी काम करत आहेत, अशी माहिती डॉ हर्षवर्धन यांना देण्यात आली. त्याशिवाय, जिल्ह्यांमध्ये कायम निरीक्षण करण्यासाठी धोरण तयार करण्यात आले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत जागतिक आरोग्य संघटनेच्या राष्ट्रीय पोलिओ निरीक्षण पथकाचे अधिकारी देखील हे निरीक्षण अधिक दृढ करण्याचे तसेच संक्रमण असलेली ठिकाणे आणि रुग्णांच्या चाचण्यांबाबत निरीक्षण आणि प्रतिसाद देण्याविषयी काम करत आहे.
डॉ हर्षवर्धन यांनी CII म्हणजेच, भारतीय उद्योग महासंघाने आयोजित चर्चासत्राअंतर्गत, भारतीय उद्योजकांशी चर्चा केली. पीएम केअर्स निधी मध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांनी उद्योजकांचे आभार मानले. उद्योजकांना सध्या भेडसावत असलेल्या समस्यांची सरकारला पूर्ण जाणीव असून अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती डॉ हर्षवर्धन यांनी दिली. कोविड-19 मुळे आरोग्यक्षेत्रात निर्माण झालेल्या संधींचा मेक इन इंडिया योजनेअंतर्गत लाभ घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी उद्योजकांना केली. उद्योजकांच्या प्रयत्नांमुळे भारत आरोग्यसुविधांच्या उपकरणांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकेल, असे ते म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळात शुध्द पाणी पिण्याबाबत आरोग्य मंत्रालयाने एक सार्वजनिक सूचनापत्र जारी केले आहे. यानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागांना, शुद्ध पेयजल पुरवठा करण्याचे,विशेषतः मदत आणि निवारा केंद्रे तसेच समाजातील असुरक्षित वस्त्यांमध्ये शुद्ध पेयजल पुरवठ्याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासठी क्लोरीनच्या गोळ्या, ब्लिचिंग पावडर आणि हायपोक्लोराईट द्रावणाचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
सध्याच्या परिस्थितीत आरोग्य साधने आणि उपकरणांची वाढती मागणी लक्षात घेऊन, ही साधने आणि सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक विस्तृत मार्गदर्शक नियमावली पाठवली आहे. या सेवांमध्ये, माता व शिशुंची काळजी, संसर्गजन्य आजारांचे प्रतिबंधक उपाय आणि व्यवस्थापन, गंभीर आणि जुनाट आजारांवरील उपचार, आणि आपत्कालीन आरोग्य सुविधांबाबत दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या सेवा-सुविधा पुरवताना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे,अशी सूचना करण्यात आली आहे. कोविड-19 समर्पित रुग्णालये वगळता, इतर रुग्णालयात तसेच खाजगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या सेवा सुरळीत चालू राहतील.
तसेच लॉकडाऊनच्या काळात लसीकरण आणि गर्भवती महिलांची शुश्रुषा अशा सेवांच्या वेळापत्रकाची पुनर्रचना करुन त्याचे दिवस निश्चित करुन या सेवा सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, मात्र त्यावेळी सामाजिक अंतर आणि नियमांचे पालन केले जावे. गर्भवती महिला, कुपोषित बालके, टीबी, एचायव्ही, व्हायरल हेपटायटीस, COPD, डायलिसीस अशा सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपआरोग्य केंद्रात आणि आयुष्मान भारत आरोग्यकेंद्रातून दिल्या जाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आतापर्यंत, देशभरात कोविड-19 च्या एकून रूग्णांची संख्या 12,380 झाली असून 414 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1489 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. भारतात कोविड-19 चा मृत्यूदर 3.3% इतका आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 12.02 टक्के आहे.
आतापर्यंत देशातील 325 जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. पुद्दुचेरी मधील माहे या जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांत नवीन रुग्ण सापडल्याची नोंद नाही. खालील 27 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. :
राज्य
|
जिल्ह्यांची संख्या
|
जिल्ह्यांची नावे
|
बिहार
|
1
|
पाटणा
|
पश्चिम बंगाल
|
1
|
नादिया
|
राजस्थान
|
1
|
प्रतापगढ
|
गुजरात
|
2
|
गिर सोमनाथ पोरबंदर
|
तेलंगणा
|
1
|
भाद्राद्री कोत्यागुंदेम
|
गोवा
|
1
|
दक्षिण गोवा
|
उत्तराखंड
|
1
|
पौरी गढवाल
|
उत्तरप्रदेश
|
1
|
पिलीभीत
|
जम्मू काश्मीर
|
1
|
राजौरी
|
मणिपूर
|
1
|
इम्फाल वेस्ट
|
छत्तीसगड
|
3
|
बिलासपूर, दुर्ग-राजनांदगाव ,रायपूर
|
मिझोराम
|
1
|
ऐझवाल पश्चिम
|
कर्नाटक
|
5
|
दावणगिरी , कोडागु , तुमकुर , उडपी आणि बेल्लारी
|
केरळ
|
2
|
वायनाड आणि कोट्टायम
|
पंजाब
|
2
|
एस बी एस नगर
होशियारपुर (29-03-2020)
|
हरियाणा
|
2
|
पानिपत
रोहतक (30-03-2020)
|
मध्य प्रदेश
|
1
|
शिवपुरी
|
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free).
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.
https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1615151)
Visitor Counter : 311
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam