गृह मंत्रालय

झूम मिटिंग प्लॅटफॉर्मच्या सुरक्षित वापराबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सूचनावली जारी

Posted On: 16 APR 2020 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 एप्रिल 2020

 

झूम मिटिंग प्लॅटफॉर्मच्या सुरक्षित वापराबाबत वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर समन्वय केंद्राने सूचनावली जारी केली आहे. हा मंच, सरकारी कामासाठी, सरकारी अधिकाऱ्यांच्या वापरासाठी नाही असे या सुचनावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.  

भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद चमूने याआधी जारी केलेल्या सुचनावलीचा संदर्भ देत झूम हा सुरक्षित मंच नसल्याचे म्हटले आहे. खाजगी वापरासाठी अद्यापही या मंचाचा वापर करणाऱ्या  व्यक्तींच्या सुरक्षेसाठी ही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.

झूम कॉन्फरन्स रूम मधे अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी आणि या कॉन्फरन्स मधे सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या टर्मिनलवर अनधिकृत सहभागी व्यक्तीकडून दुर्भावनेने अटॅक रोखणे हा या सूचनावलीचा उद्देश आहे. व्यक्तींनी  घ्यायच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत तपशीलवार माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane


(Release ID: 1615086) Visitor Counter : 275