अर्थ मंत्रालय
कोविड -19 साथीच्या परिस्थितीत करदात्यांना मदत करण्यासाठी सीबीडीटीने एका आठवड्यात 4,250 कोटी रुपयांचे 10.2 लाखांहून अधिक परतावे जारी केले
Posted On:
15 APR 2020 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2020
कोविड -19 साथीच्या परिस्थितीत करदात्यांना मदत करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे प्रलंबित प्राप्तिकर परतावे जारी करण्याबाबत 8 एप्रिल 2020 रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारने घोषित केलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आज सांगितले कि सुमारे 4,250 कोटी रुपयांचे 10.2 लाखांहून अधिक परतावे यापूर्वीच देण्यात आले आहेत. 2019-20 आर्थिक वर्षात 31 मार्च 2020 पर्यंत दिलेल्या 1.84 लाख कोटी रुपयांच्या 2.50 कोटी पेक्षा अधिक परताव्यांव्यतिरिक्त हे परतावे आहेत.
सीबीडीटीने पुढे म्हटले आहे कि या आठवड्यात सुमारे 1.75 लाख अधिक परतावे देण्याची प्रक्रिया सुरु आहे. परतावे जारी झाल्याच्या तारखेपासून 5-7 कामकाजाच्या दिवसांमध्ये ते थेट करदात्याच्या बँक खात्यात जमा होतील. मात्र सुमारे 1.74 लाख प्रकरणांमध्ये करदात्यांकडून त्यांच्या थकित कर मागणीच्या समेटासंदर्भात ईमेल द्वारे प्रतिसादांची प्रतिक्षा केली जात असून त्यांना आठ दिवसांच्या आत उत्तर द्यायला सांगणारे एक स्मरणपत्र ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहे जेणेकरून त्यानुसार परतावा देता येईल.
हे नमूद करावे लागेल की आय-टी विभागाकडून पाठवण्यात आलेली ही स्मरणपत्रे खरे तर करदात्यांच्या फायद्यासाठी आहेत, कारण परतावे देण्यापूर्वी या स्मरणपत्रातून त्यांची थकबाकीची मागणी, त्यांची बँक खाती याबाबत पुष्टी केली जाते आणि काही तफावत असेल तर ती दूर केली जाते.
सीबीडीटीने आवाहन केले आहे की अशा ईमेलला लवकरात लवकर प्रतिसाद देणे हे करदात्यांच्या हिताचे आहे, जेणेकरुन लवकरात लवकर परताव्यावर काम सुरु होईल आणि लवकर देता येतील. सीबीडीटीने करदात्यांना त्यांचे ईमेल तपासण्याची आणि आय-टी विभागाला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी त्यांच्या ई-फायलिंग खात्यावर लॉग इन करण्याची विनंती केली आहे.
सीबीडीटीने असेही म्हटले आहे की सोशल मीडियासह काही माध्यमांमध्ये करदात्यांना सीबीडीटीच्या संगणकीकृत ईमेलवरून 7 दिवसांच्या आत उत्तर देण्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात असल्याची दखल घेण्यात आली आहे. या संदर्भात हे स्पष्ट करण्यात आले आहे की करदात्यांकडून सदोष आयटीआर, प्रथमदृष्ट्या समायोजन आणि त्यांनी केलेल्या काही दाव्यांची पुष्टी करण्यासाठी करदात्याबरोबर संवाद साधण्याची ही आवश्यक नियमित प्रक्रिया आहे. अशा सर्व प्रकरणांमध्ये करदात्याकडून त्वरित प्रतिसाद मिळाल्यास प्राप्तिकर विभागाकडून त्यांच्या परताव्यावर त्वरित काम केले जाऊ शकते.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1614826)
Visitor Counter : 205
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam