श्रम आणि रोजगार मंत्रालय
कामगारांच्या वेतनाशी संबंधित तक्रारी दूर करण्यासाठी 20 नियंत्रण कक्षांची स्थापना
Posted On:
14 APR 2020 1:58AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020
कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवणार्या समस्यांच्या पार्शवभूमीवर श्रम आणि रोजगार मंत्रालयाने संपूर्ण देशभरात मुख्य कामगार आयुक्त (सीएलसी) (सी) कार्यालयांतर्गत, 20 नियंत्रण कक्षांची स्थापना केली आहे. खाली दिलेल्या कारणांसाठी या नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
a). मध्यवर्ती क्षेत्रात कार्यरत कामगारांच्या वेतनाशी संबंधित तक्रारी दूर करणे.
b). विविध राज्य सरकारांशी समन्वय साधून स्थलांतरित कामगारांच्या अडचणी दूर करणे.
या नियंत्रण कक्षांशी कामगारांना फोन नंबर, व्हॉट्स अप आणि ईमेलद्वारे संपर्क करता येतो. हे नियंत्रण कक्ष कामगार अंमलबजावणी अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, प्रादेशिक कामगार आयुक्त आणि संबंधित विभागांचे उप-मुख्य कामगार आयुक्त यांच्यामार्फत व्यवस्थापित केले जात आहेत. सर्व २० नियंत्रण कक्षांच्या कामकाजावर मुख्यालयाचे मुख्य कामगार आयुक्त (सी) दररोज देखरेख करतात.
सर्व संबंधित अधिकाऱ्यांना असे सूचित केले गेले आहे की त्यांनी पीडित कामगारांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी मानवी दृष्टिकोन अवलंबावा आणि गरजूना वेळेवर शक्य ती मदत पोहचवावी.
विभागानुसार अधिकाऱ्यांचा तपशील, कामगार हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेल आयडी जोडला गेला आहे.
कोविड-19 संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी मध्यवर्ती क्षेत्रातील विभागानुसार तपशीलासाठी येथे क्लिक करा..
B.Gokhale/V.Joshi/P.Kor
(Release ID: 1614276)
Visitor Counter : 281
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam