आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती
Posted On:
13 APR 2020 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020
कोविड-19 चा सामना करण्यासठी देशभरात अनेक एकत्रित प्रयत्न सुरु असतांनाचा, भारत सरकारने, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी, लॉकडाउन कंटेनमेंट-परीबंधन आणि व्यवस्थापनासाठी अनेक पावले उचलली आहेत. या सर्व उपाययोजनांचा आढावा आणि देखरेख सर्वोच्च पातळीवरुन दररोज केली जात आहे.
केंद्रीय आरोग्य ,स्वच्छता आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोविड19 विषयी CSIR (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) करत असलेल्या संशोधनाचा आढावा घेतला. या बैठकीला सीएसआयआर चे महासंचालक आणि त्यांच्या 38 लॅब्सचे संचालक उपस्थित होते.
CSIR च्या प्रयोगशाळा सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रांतील विभागासोबत एकत्रित काम करत असून, मध्यम आणि लघु उद्योग तसेच मंत्रालयांचेही सहकार्य घेत आहेत.या संदर्भात त्यांनी पाच शाखा निश्चित केल्या आहेत. ज्यानुसार,
- डिजिटल आणि मोलीक्युलर निरीक्षण,
- रॅपिड आणि स्वस्त निदान,
- नवी औषधे / औषधांचे आणि संलग्न उत्पादन प्रक्रियांची पुनर्निर्मिती,
- रुग्णालयांना सहायक उपकरणे आणि PPE, आणि,
- लॉजिस्टिक सपोर्ट सिस्टीमची पुरवठा साखळी
कोविड-19 चा सामना करताना जिल्हा प्रशासनाच्या समस्यांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी, आरोग्य मंत्रालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. लाईव्ह रुग्ण ट्रॅकिंगसाठी, रुग्ण व्यवस्थापन आणि कंटेनमेन्ट योजनेच्या अंमलबजावणी व देखरेखीसाठी तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाचे जीआयएस मैपिंग, कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या जागा ओळखणे, हिट मैपिंगचा वापर आणि अनुमानात्मक आकडेवारीच्या आधारे विश्लेषण, अशा पद्धती वापरुन परिबंधन योजनेचे प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. बेंगरूळू येथे असलेल्या वॉर रूम येथे अशा तंत्रज्ञानाची विशेष मदत घेतली जात आहे.
एकात्मिक आदेश केंद्रांद्वारे रॅपिड रिस्पॉन्स टिम्सशी समन्वय साधून, फिल्ड स्क्रीनिंग, रुग्णवाहिका व्यवस्था तसेच विलगीकरण व्यवस्थापन अशी कामे केली जात आहेत. काही जिल्ह्यात,जिथे औषधांची दुकाने जोडली आहेत, तिथे दूरस्थ डिजिटल वैद्यकीय सल्ला आणि उपचार केले जात आहेत.
या प्रभावी अंमलबजावणीचे उत्तम परिणाम देशातील 15 राज्यातल्या 25 जिल्ह्यांमध्ये दिसत असून, या सर्व जिल्ह्यात या आधी कोरोनाचे रुग्ण आढळले होते. मात्र, गेले 14 दिवस या सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत.यात महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचाही समावेश आहे.
10 एप्रिलपर्यंत, प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 30 कोटींपेक्षा जास्त 28,256 कोटी रुपयांची थेट आर्थिक मदत मिळाली आहे. या मदतीमुळे लॉकडाऊनमुळे त्यांच्या आयुष्यावर झालेले विपरीत परिणाम कमी होत आहेत. या मदतीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:-- .
- प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत 19.86 महिला खातेधारकांच्या खात्यांत 9930 कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.
- प्रधानमंत्री किसान सम्मान निधी(PM-KISAN), योजनेअंतर्गत, 6.93 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 13,855 कोटींची रक्कम टाकली गेली आहे.
- विधवा, जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग अशा 2.82 कोटी लोकांना आतापर्यंत 1405 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे.
- 2.16 बांधकाम आणि पायाभूत सुविधा कामगारांना 3066 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
आरोग्य सेतू हे मोबाईल app सुरु करण्यात आले असून त्याद्वारे नागरिकांना स्वतःला कोविड19 च्या धोक्याविषयी स्वयंमूल्यांकन करता येईल. ज्यामुळे, ते जर एखाद्या संसर्गित रुग्णाच्या संपर्कात आले असतील, तर त्यांना त्याविषयी अलर्ट केले जाईल. 11 भाषांमध्ये असलेले हे अँप आतापर्यंत 3.5 कोटी लोकांनी डाउनलोड केले आहे. त्याच्या विविध वैशिष्ट्यांमध्ये धोका ओळखणे, संपर्कशोध अशा माध्यमातून ब्लूटूथ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरुन व्यक्तीला कोविडच्या धोक्याची जाणीव करुन दिली जाते.
राज्य ग्रामीण आजीविका अभियानाअंतर्गत आतापर्यंत 27 राज्यातील 78,373 हजार स्वयं सहायता गटांच्या सदस्यांनी 1.96 कोटी मास्क तयार केले आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेचे कैडेट NCC योगदान अंतर्गत स्थानिक प्रशासनाला लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात मदत करत आहेत. 50 हजार पेक्षा अधिक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
आतापर्यंत कोविड19 चे देशभरातील गेल्या 24 तासांत कोरोनाचे 796 नवे रुग्ण आढळले ज्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9,152 इतकी झाली आहे.
आतापर्यंत एकूण 857 रुग्ण कोविड19 च्या आजारातून बरे झाले असून त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. आतापर्यंत देशात एकूण 308 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1614107)
Visitor Counter : 164
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam