नागरी उड्डाण मंत्रालय

देशभरात वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करताना लाईफलाईन उडान विमानांची 2 लाख किलोमीटर पेक्षा जास्त अंतराची भरारी

Posted On: 13 APR 2020 7:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020

 

कोविड -19 विरुद्धच्या भारताच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी देशातील दुर्गम भागात आवश्यक वैद्यकीय मालवाहतूक करताना नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या  218  पेक्षा जास्त लाइफलाईन उडान विमानांनी उड्डाण केले आहे असे ट्विट नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री (वाणिज्य आणि उद्योग) हरदीपसिंग पुरी यांनी केले आहे. आजपर्यंत  लाईफलाईन उडानच्या विमानांनी 377.50 टन मालवाहतूक केली आणि 2,05,709 कि.मी.पेक्षा जास्त हवाई अंतर पार केले. यापैकी 132 उड्डाणे एअर इंडिया आणि अलायन्स एअरने चालविली आहेत. 12 एप्रिल 2020 रोजी 4.27 टन मालवाहतूक झाली.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि विमान उद्योग अत्यंत कार्यक्षम आणि  किफायतशीर मार्गाने भारताबाहेर आणि परदेशात वैद्यकीय साहित्याची वाहतूक करून कोविड-19 विरुद्धच्या भारताच्या लढ्यास पाठिंबा देण्यास कटिबद्ध आहे.

ईशान्य प्रदेश, बेट प्रदेश आणि डोंगराळ राज्य यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एअर इंडिया आणि आयएएफने प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य आणि इतर बेट प्रांतासाठी सहयोग केला आहे. मालवाहतूकीत मोठ्या प्रमाणात वजनाने हलक्या अशा मास्क, ग्लोव्ज आणि इतर उपभोग्य वस्तूंचा   समावेश आहे. योग्य काळजी घेऊन प्रवासी बसण्याच्या ठिकाणी आणि डोक्यावरच्या केबिनमध्ये माल ठेवण्यासाठी खास परवानगी घेण्यात आली आहे.

हितसंबंधितांशी सातत्याने समन्वय साधण्यासाठी लाइफलाईन उडान विमानांशी संबंधित सार्वजनिक माहिती दररोज  https://esahaj.gov.inlifeline_udan/public_info. पोर्टलवर अद्ययावत केली जाते. देशांतर्गत हवाई वाहतूक कंपनी स्पाईस जेट, ब्लू डार्ट आणि इंडिगो व्यावसायिक आधारावर मालवाहू उड्डाणे चालवित आहेत. स्पाइस जेटने  24 मार्च ते 12 एप्रिल 2020 या कालावधीत 300  मालवाहू उड्डाणे चालविली असून  4, 26, 533 किमी अंतर कापत 2478 टन मालाची वाहतूक केली आहे. यापैकी 95 उड्डाणे आंतरराष्ट्रीय मालवाहतूक उड्डाणे होती. ब्लू डार्टने 25 मार्च ते 12 एप्रिल 2020 या कालावधीत 94 देशांतर्गत मालवाहू उड्डाणे चालविली ज्यामध्ये, 92,075 किमी अंतर पार केले असून 1479 टन मालवाहतूक केली आहे. इंडिगोने 3-12 एप्रिल 2020 या कालावधीत 25 मालवाहू विमानांद्वारे 21,906  कि.मी.पर्यंतचे अंतर पार करून 21.77 टन मालवाहतूक केली. यात शासनासाठी विनाशुल्क वैद्यकीय पुरवठ्याचा देखील समावेश आहे.

स्पाईसजेटने केलेली देशांतर्गत मालवाहतूक

तारीख

      विमान उड्डाणे       

टन

       किलोमीटर          

    12-04-2020      

6     

     68.21         

6,943

 

स्पाइसजेटने केलेली आंतरराष्ट्रीय मालवाहतूक

  

         तारीख

       विमान उड्डाणे      

        टन

     किलोमीटर         

     12-04-2020          

          8

      75.23       

      18,300

 

आंतरराष्ट्रीय क्षेत्र

फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे आणि कोविड -19 मदत साहित्याच्या वाहतुकीसाठी 4 एप्रिल २०२० पासून एअर ब्रिजची स्थापना करण्यात आली आहे. दक्षिण आशियामध्ये, एअर इंडियाने 7 एप्रिल 2020 रोजी सुमारे 9 टन आणि 8 एप्रिल 2020 रोजी 4 टन कोलंबोला पुरवठा केला. आवश्यकतेनुसार एअर इंडिया तातडीच्या वैद्यकीय पुरवठ्यांच्या हस्तांतरणासाठी इतर देशांमध्ये नियोजित मालवाहू उड्डाणे करणार आहे.

वैद्यकीय साहित्य आणल्याचा तारीखवार तपशील खालीलप्रमाणे:-

अनुक्रमांक  

तारीख

स्थान

          परिमाण (टन)   

1

       04-04-2020     

शांघाय

21

2

07-04-2020

      हॉंगकॉंग   

6

3

09-04-2020

शांघाय

22

4

10-04-2020

शांघाय

18

5

11-04-2020

शांघाय

18

6

12=04-2020

शांघाय

24

 

 

एकूण

109

 

सर्व टप्प्यावर मालवाहू हाताळणी योग्य सुरक्षा उपायांद्वारे केली जाते.

 

केरळशी संबंधित वैद्यकीय मालवाहतूक करणारे कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ

 

 

 

 B.Gokhale/V.Joshi/D.Rane



(Release ID: 1614049) Visitor Counter : 253