अर्थ मंत्रालय

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत मजबूत डिजिटल देयक पायाभूत सुविधा देयकाचे तत्काळ हस्तांतरण सक्षम करते

Posted On: 12 APR 2020 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020

जनधन खाती तसेच खातेधारकांचे मोबाईल क्रमांक आणि आधार [जनधन-आधार-मोबाईल (जेएएम)] यांची नोंद असलेली इतर खाती लिंक करून त्याच्या माध्यमातून डिजिटल देय प्रणाली सुरु करण्यात आली आहे. ही पायाभूत सुविधा डीबीटी प्रवाह, सामाजिक सुरक्षा / निवृत्तीवेतन इत्यादी योजनांचा अवलंब इत्यादींसाठी आवश्यक आधार प्रदान करते. बँकेत खाती नसणाऱ्या लोकांना बँक खाती उघडून द्यायच्या उद्देशाने ऑगस्ट 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना (पीएमजेडीवाय) सुरु करण्यात आली. 20 मार्च 2020 पर्यंतच्या सर्व 126 क्रियाशील सीएएसए खात्यांपैकी 38 कोटींहून अधिक खाती पीएमजेडीवाय अंतर्गत उघडण्यात आली आहेत. 

इंटरऑपरेबल, वेगवान आणि अचूक व्यवहाराची सक्षमता-

  • बँक खाती बँक शाखा, व्यवसाय प्रतिनिधी (बीसी) जागा, व्यापारी ठिकाआणि इंटरनेटवर रोख आणि डिजिटल दोन्ही व्यवहार करण्यास सक्षम आहेत. बँकिंग सेवांसाठी आणि किरकोळ देयांसाठी बायोमेट्रिक आयडी वापरुन, एईपीएस / भीम आधार पे यासारख्या अत्यंत स्वस्त-प्रभावी पेमेंट उपाययोजना तयार केल्या आहेत.
  • डिजिटल पेमेंट व्यवस्थेमध्ये खालील पद्धतींचा समावेश आहे:
  1. एईपीएस: शाखा / बीसी येथे आधार प्रमाणीकरण वापरुन रोख रक्कम काढण्यास मदत होते
  2. भीम आधार पे: आधार प्रमाणिकरण वापरून व्यापारांना पेमेंट करणे शक्य 
  3. रूपे डेबिट कार्ड: 31 मार्च 2020 पर्यंत पीएमजेडीवाय खात्यांमध्ये 29 कोटी किंमतीच्या रूपे डेबिट कार्डांसह 60.4 कोटी किंमतीची रूपे कार्ड वितरीत करण्यात आली आहेत. ही कार्डे एटीएममध्ये रोखीने पैसे काढण्यासाठी आणि पॉईंट्स ऑफ सेल (पीओएस) आणि डिजिटल पेमेंटसाठी ईकॉमर्समध्ये वापरली जाऊ शकतात.
  4. युपीआय: त्वरित वेळेवर पेमेंट करणारी प्रणाली जी व्यक्ती ते व्यक्ती (पी 2 पी) आणि व्यक्ती ते व्यापारी पी 2 एम व्यवहारांना मदत करते.
  5. बीबीपीएस: इंटरनेट आणि बीसी स्थानांद्वारे रोख आणि डिजिटल पद्धतींचा उपयोग करुन युटिलिटी बिले भरण्यास मदत होते.

वर नमूद केलेल्या डिजिटल पेमेंट पायभूत सुविधांचा उपयोग करून, कोविड-19 मुळे पुकारलेल्या लॉकडाऊनच्या परिणामापासून बचावासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 26 मार्च रोजी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत 30 कोटीहून अधिक गरीबांना 28,256 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 10 एप्रिल 2020 पर्यंत लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे रक्कम देण्यात आली आहे.

योजना

लाभार्थ्यांची संख्या

अंदाजे रक्कम

पीएमजेडीवाय महिला खातेदारांना पाठिंबा

19.86 कोटी (97%)

9930 कोटी रुपये

पीएम-किसान अंतर्गत शेतकऱ्यांना मोबदला

6.93 कोटी (8 कोटी पैकी)

13,855 कोटी रुपये

एनएसएपी लाभार्थ्यांना पाठिंबा

(विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग)

2.82 कोटी

1405 कोटी रुपये

इमारत आणि इतर बांधकाम कामगारांना पाठिंबा

2.16 कोटी

3066 कोटी रुपये

एकूण

31.77 कोटी

28,256 कोटी रुपये

 

 

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1613780) Visitor Counter : 223