नागरी उड्डाण मंत्रालय

लाईफलाईन उडान विमानांद्वारे देशभरात एकाच दिवशी 108 टन जीवनावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

Posted On: 12 APR 2020 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020

कोविड -19 विरुद्धच्या भारताच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी देशातील दुर्गम भागात जीवनावश्यक वैद्यकीय साहित्याची वाहतूक करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयामार्फत  214  हून अधिक लाइफलाईन उडान उड्डाणे चालविली गेली आहेत. यातील 128 उड्डाणे एअर इंडिया आणि अलायन्स एअरने चालविली आहेत. आजपर्यंत सुमारे 37373.23 टन मालवाहतूक झाली आहे. लाईफलाईन उडान विमानांनी आत्तापर्यंत कापलेले हवाई अंतर 1,99,784 किमीपेक्षा जास्त आहे असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाध्ये यांनी सांगितले. 11 एप्रिल 2020 रोजी झालेली मालवाहतूक 108 टन होती. नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि विमान उद्योग अत्यंत कार्यक्षम आणि  किफायतशीर मार्गाने भारताबाहेर आणि परदेशात वैद्यकीय साहित्याची वाहतूक करून कोविड-19 विरुद्धच्या भारताच्या लढ्यास पाठिंबा देण्यास कटिबद्ध आहे.

ईशान्य प्रदेश, बेट प्रदेश आणि डोंगराळ राज्य यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एअर इंडिया आणि आयएएफने प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य आणि इतर बेट प्रांतासाठी सहयोग केला आहे. मालवाहतूकीत मोठ्या प्रमाणात वजनाने हलक्या अशा मास्क, ग्लोव्ज आणि इतर उपभोग्य वस्तूंचा   समावेश आहे. योग्य काळजी घेऊन प्रवासी बसण्याच्या ठिकाणी आणि डोक्यावरच्या केबिनमध्ये माल ठेवण्यासाठी खास परवानगी घेण्यात आली आहे.

    लाइफलाईन उडान विमानांशी संबंधित सार्वजनिक माहिती दररोज https://esahaj.gov.inlifeline_udan/public_info.पोर्टलवर अद्ययावत केली जाते. राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) आणि  नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने (एमओसीए) केवळ तीन दिवसांच्या विक्रमी कालावधीत विविध हितसंबंधितांशी सातत्याने समन्वय साधण्यासाठी हे पोर्टल विकसित केले आहे.देशांतर्गत हवाई वाहतूक कंपनी स्पाईस जेट, ब्लू डार्ट आणि इंडिगो व्यावसायिक आधारावर मालवाहू उड्डाणे चालवित आहेत. स्पाइस जेटने  286 मालवाहू उड्डाणे चालविली असून 4,01,290 किमी अंतर कापत 2334.51 टन मालवाहतूक केली आहे. यापैकी 87 उड्डाणे आंतरराष्ट्रीय मालवाहतूक उड्डाणे होती. ब्लू डार्टने 94 देशांतर्गत मालवाहू उड्डाणे चालविली ज्यामध्ये,92,075 किमी अंतर पार केले असून   1479 टन मालवाहतूक केली आहे. इंडिगोने 25 मालवाहू विमानांद्वारे 21,906  कि.मी.पर्यंतचे अंतर पार करून 21.77 टन मालवाहतूक केली. यात शासनासाठी विनाशुल्क वैद्यकीय पुरवठ्याचा देखील समावेश आहे.

स्पाइसजेटने केलेली देशांतर्गत मालवाहतूक

तारीख

एकूण विमाने

टन

किमी

 

11-04-2020

9

40.36

7271

 

 

 

 

स्पाइसजेटने केलेली आंतरराष्ट्रीय मालवाहतूक

तारीख

एकूण विमाने

टन

किमी

 

11-04-2020

11

103.35

21,100

 

 

 

 

ब्लू डार्टने केलेली मालवाहतूक

तारीख

एकूण विमाने

टन

किमी

 

11-04-2020

8

145.000

7,856.00

 

 

 

 

 

इंडिगोने केलेली मालवाहतूक

तारीख

एकूण विमाने

टन

किमी

 

11-04-2020

6

15.66

4,829

 

 

 

 

 

(टीप - इंडिगोच्या टन मालवाहतूकीत नि: शुल्क (एफओसी) तत्त्वावर चालविल्या जाणार्‍या वैद्यकीय पुरवठा असलेल्या शासकीय मालाचा समावेश आहे.)

आंतरराष्ट्रीय क्षेत्र

फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे आणि कोविड -19 मदत साहित्याच्या वाहतुकीसाठी 4 एप्रिल २०२० पासून एअर ब्रिजची स्थापना करण्यात आली आहे. तारीखवार खालीलप्रमाणे वैद्यकीय साहित्य आणले.

क्रमांक

तारीख

स्थान

परिमाण टन

1

04-04-2020

शांघाय

21

2

07-04-2020

हॉंगकॉंग

6

3

09-04-2020

शांघाय

22

4

10-04-2020

शांघाय

18

5

11-04-2020

शांघाय

18

 

 

एकूण

85

दक्षिण आशियामध्ये एअर इंडियाने 7 एप्रिल 2020 रोजी सुमारे 9 टन आणि 8 एप्रिल 2020 रोजी 4 टन कोलंबोला पुरवठा केला. आवश्यकतेनुसार एअर इंडिया तातडीच्या वैद्यकीय पुरवठ्यांच्या हस्तांतरणासाठी इतर देशांमध्ये नियोजित मालवाहू उड्डाणे करणार आहे.

बऱ्याच नियामक उपक्रमांची घोषणा केली गेली आहे, ज्यात आंतरजालमध्ये (i) सुरक्षिततेच्या आवश्यकतांच्या अधीन असलेल्या मालवाहतुकीसाठी विमानाच्या प्रवासी केबिनचा वापर करण्याची परवानगी समाविष्ट आहे; (ii) विमानतळांवरील आयात मालावरील विलंब शुल्कावर  50 % पर्यंत सूट ; आणि (iii) धोकादायक वस्तूंच्या प्रमाणपत्रांच्या वैधतेचा विस्तार (उदा. औषधांसाठी वापरली जाणारी रसायने) यांचा समावेश आहे.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1613778) Visitor Counter : 123