विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कोविड संक्रमण रोखण्यासाठी CSIR अंतर्गत हाती घेतलेल्या कामांचा आणि 38 प्रयोगशाळांच्या कार्याचा डॉ हर्षवर्धन यांच्याकडून आढावा
संचालक आणि महासंचालकांशी विडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा
Posted On:
12 APR 2020 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज CSIR म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या कामांचा आढावा घेतला. कोविड-19 शी लढा देण्यासाठी सीएसआरआर ने 38 प्रयोगशाळा विकसित केल्या आहेत. सीएसआरआरचे महासंचालक डॉ शेखर मांडे आणि सीएसआरआरच्या सर्व प्रयोगशाळांच्या संचालकांशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली.
कोविड संबंधित उपक्रम राबवण्यासाठी तयार केलेला कोअर धोरण गट आणि पाच शाखांची यावेळी मांडे यांनी डॉ हर्षवर्धन यांना माहिती दिली. त्याशिवाय, PPE आणि मास्कची उपलब्धता, पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक सपोर्ट याविषयी देखील या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सध्या CSIR सर्व सार्वजनिक कंपन्या, लघु-मध्यम आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील कंपन्यांसोबत काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
CSIR-IGIB यांनी एकत्रित रेपिड आणि स्वस्त अशी चाचणी किट बनवल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.
सध्या CSIR च्या 14 प्रयोगशाळा कोरोना विषाणूच्या चाचण्या करत आहेत. त्याशिवाय, प्लाझ्मा आधारित संशोधन सुरु असल्याबद्दल देखील आरोग्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली.
CSIR-IICT चे संचालक डॉ चंद्रशेखर यांनी विशिष्ट औषधांसाठी लागणारे घटक तयार करण्याबाबत सुरु असलेल्या संशोधनांची माहिती आरोग्यमंत्र्यांना दिली. प्रतिबंधक आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे विकसित करण्यासाठी CSIR आयुष मंत्रालयासोबत काम करत आहे, अशी माहिती, त्यांनी आरोग्यमंत्र्यांना दिली.
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1613763)
Visitor Counter : 150
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada