ग्रामीण विकास मंत्रालय
देशात कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी एनआरएलएम स्वयं सहाय्यता गटाच्या महिलांची समूह योद्ध्या म्हणून कामगिरी
27 एसआरएलएमच्या 78,000 स्वयं सहाय्यता गटाच्या सदस्यांकडून सुमारे 2 कोटी मास्कची निर्मिती
विविध राज्यातल्या स्वयं सहाय्यता गटांकडून 5000 पेक्षा जास्त पीपीई संचाची निर्मिती
Posted On:
12 APR 2020 6:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे, जगभरात अभूतपूर्व अशी आरोग्य विषयक आणीबाणी उद्भवली आहे. भारतात,मास्क,पीपीई, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस यांच्यासाठी फेस शिल्ड यासारख्या वैद्यकीय सुविधांची आवश्यकता वाढली आहे.अनेक भागात मास्क वापरणे सरकारने अनिवार्य केले आहे.देशात, ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत,दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएवाय-एनआरएलएम) यामध्ये,63 लाख स्वयंसहाय्यता गटाच्या सुमारे 690 लाख महिला सदस्य आहेत.कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गाने मदत करत, या स्वयं सहाय्यता गटाच्या सदस्य महिला, सामुहिक योद्ध्या म्हणून सरसावल्या आहेत.
कोविड-19 पासून प्राथमिक संरक्षण करण्यात मास्क सर्वप्रथम आहे, हे लक्षात घेऊन,या स्वयं सहाय्यता गटाच्या महिलांनी,मास्क निर्मितीचे काम तातडीने हाती घेतले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांच्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून, आणि राज्यातल्या आरोग्य विभागाच्या सूचनांप्रमाणे, 2-3 पदरी शिवलेले,सर्जिकल मास्क,कापडी मास्क अशा विविध वर्ग गटातले मास्क हे स्वयंसहाय्यता गट तयार करत आहेत.
आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन,कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर असणारे कर्मचारी,पोलीस, तसेच खुल्या बाजारातही या मास्कचा पुरवठा करण्यात येत आहे.अनेक राज्यात ग्रामीण भागातल्या घरांमध्ये याचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
या स्वयं सहाय्यता गटांनी आता एप्रन,गाऊन, फेस शिल्ड यासारख्या पीपीई निर्मितीचेही काम हाती घेतले आहे.
मास्क,पीपीई,फेस शिल्ड इत्यादीचे स्वयं सहाय्यता गटांनी केलेले उत्पादन याप्रमाणे-
- मास्क- 27 राज्य ग्रामीण उपजीविका अभियानानी दिलेल्या माहिती नुसार, 8 एप्रिल 2020 पर्यंत,स्वयं सहाय्यता गटांनी 1.96 कोटी मास्कची निर्मिती केली. 78,373 स्वयं सहाय्यता गट सदस्य सध्या मास्क निर्मितीच्या कामात गुंतलेल्या आहेत. झारखंड स्वयं सहाय्यता गटांनी सर्व प्रथम प्रतिसाद देत 22 मार्च 2020 पासून 78,000 मास्कची निर्मिती केली. विविध जिल्हा अधिकाऱ्यांच्या इमारती आणि अनुदानित औषध विक्री दुकानात दहा रुपये या माफक दरात त्याची विक्री करण्यात येत आहे. देशाच्या पूर्व भागातून छत्तीसगडच्या 2516 ग्रामीण भागातल्या महिलांचा समावेश असलेल्या 853 स्वयं सहाय्यता गटांनी मास्क चा पुरवठा केला.ओदिशातल्या स्वयं सहाय्यता गटांनी, जनतेला वाटप करण्यासाठी,दहा लाखाहून अधिक मास्क तयार केले.
- आंध्रप्रदेश मधे, 13 उप-विभागाच्या 2254 गटांनी,सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत कापडी फेस मास्क तयार केले.कर्नाटक ग्रामीण स्वयं सहाय्यता गटांनी, कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी,निष्ठेने, केवळ 12 दिवसात,1.56 लाख फेस मास्क तयार केले.
- उत्तर गोवा जिल्हा ग्रामीण विकास एजन्सीने, स्वयं सहाय्यता गटांच्या मदतीने,राज्यात 2000 मास्क पुरवले. मास्कची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, हिमाचल प्रदेश स्वयं सहाय्यता गटांच्या , 2000 महिला सदस्य, संरक्षक मास्क निर्मितीच्या कामात गुंतल्या आहेत.
- वैयक्तिक संरक्षण साधने- एप्रन,गाऊन, फेस शिल्ड यासारख्या पीपीई निर्मितीचेही काम स्वयं सहाय्यता गटांनी हाती घेतले आहे. मध्य प्रदेश,हिमाचल प्रदेश,पंजाब,कर्नाटक यासारख्या विविध राज्यातल्या स्वयं सहाय्यता गटांनी,आतापर्यंत,सुमारे 5000 पीपीई संचांची निर्मिती केली आहे. पंजाब राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाने, कपुरथळा नागरी शल्यचिकित्स्कांना 500 एप्रन पुरवले,तर मेघालयने जिल्हा वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना 200 फेस शिल्ड पुरवले. कर्नाटकने 125 फेस शिल्डची निर्मिती केली.मेघालय,झारखंड,कर्नाटक,हिमाचल प्रदेश,पंजाब राज्य ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत फेस शिल्ड,गाऊन,यांची निर्मिती, स्वयं सहाय्यता गटांकडून करण्यात येत आहे.
- परवडणाऱ्या दरातल्या हॅन्ड सॅनीटायझरसह आपापल्या समाजात हातांच्या स्वच्छतेबाबत प्रोत्साहन देण्याला महिलांचे सामुहिक प्रयत्न
डीएवाय-एनआरएलएमने सहाय्य केलेल्या सूक्ष्म आस्थापनांनी, हॅन्ड सॅनीटायझरसह हात धुण्यासाठीची उत्पादने निर्मितीचे काम हाती घेतले आहे. 9 राज्यातल्या 900 स्वयं सहाय्यता गट आस्थापनांनी 1.15 लाख लिटर सॅनीटायझरचे उत्पादन केले आहे.तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यांनी प्रत्येकी 25,000 लिटर पेक्षा जास्त उत्पादन केले. तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश,झारखंड,केरळ,मणिपूर,नागालॅड,मिझोरम आणि उत्तर प्रदेश या राज्यातल्या सुमारे 900 स्वयं सहाय्यता गट आस्थापने, सॅनीटायझरचे उत्पादन करत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, चार घटकांच्या मिश्रणाने झारखंडमधे सॅनीटायझर विकसित करण्यात येत आहेत. अल्कोहोल (72%),डीस्टील वोटर(13%),ग्लिसरीन (13%),आणि बेसिल (2%) यांचा वापर करून सॅनीटायझर विकसित करण्यात येत आहेत. त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी लेमन ग्रास किंवा बेसिलचा उपयोगही करण्यात येत आहे. सॅनीटायझरच्या 100 मिली बाटलीसाठी साधारणतः 30 रुपये किंमत आकारण्यात येत असून सार्वजनिक रुग्णालये आणि पोलीस ठाण्यात ते उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
आपापल्या समाजात, आरोग्याच्या उत्तम सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी, उपजीविकेबरोबरच सामाजिक सामुहिक योगदानाद्वारे या महिला कोविड-19 विरोधातल्या लढ्यात निष्ठेने कार्य करत आहेत.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1613700)
Visitor Counter : 286
Read this release in:
English
,
Gujarati
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada