शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे “युक्ती” या कोविड संदर्भातल्या वेबपोर्टलचे उद्‌घाटन

Posted On: 12 APR 2020 2:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020

 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे ‘युक्ती’ म्हणजेच, यंग इंडिया कॉम्बेटिंग कोविड विथ ज्ञान(नॉलेज), तंत्रज्ञान (टेक्नोलॉजी) नवीनीकरण (इनोव्हेशन)या वेब पोर्टलचे उद्‌घाटन झाले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कोविड19 च्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेले उपक्रम आणि उपाययोजना यांची नोंद ठेवणे तसेच त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. कोविडच्या आव्हानांचा विविध अंगांनी आणि सर्वसमावेशक बाजूंनी सामना करण्यासाठी या पोर्टलची मदत होईल.

यावेळी बोलताना पोखरियाल म्हणाले की, कोविडच्या पार्श्वभूमीवर आपले प्राथमिक उद्दिष्ट शिक्षणसंस्थेतील सर्व घटकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवणे हे आहे. तसेच, विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे शैक्षणिक वातावरण कायम ठेवायचे आहे. या आव्हानात्मक काळात हे उद्दिष्ट साध्या करण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरेल.

या पोर्टलवर सर्व शिक्षणसंस्थांच्या विविध उपक्रम आणि संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांना या काळात संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर दर्जेदार सेवा मिळण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विविध शिक्षणसंस्थांनी कोविड च्या आव्हानात्मक काळात निर्माण झालेल्या स्थितीत काही धोरणात्मक उपाययोजना या पोर्टलवर टाकाव्यात असेही त्यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यात या पोर्टलच्या माध्यमातून मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवता येईल.

या पोर्टलद्वारे मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील संवादाचे मध्यम ठरेल, असेही पोखरियाल म्हणाले.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 (Release ID: 1613590) Visitor Counter : 290