विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

फरीदाबाद क्षेत्रासाठी ‘टीएचएसटीआय’च्या ‘डीबीटी’ला कोविड-19 चाचणी सुविधा केंद्र म्हणून आयसीएमआरची मान्यता


फरीदाबाद क्षेत्रासाठी ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या जैव-आमापन विभागाच्यावतीने पहिले आणि एकमेव कोविड-19 चाचणी सुविधा केंद्र

Posted On: 12 APR 2020 2:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020

फरिदाबाद इथल्या ‘टीएचएसटीआय’ अर्थात ‘ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’च्या जैव-आमापन विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये आता कोविड-19साठी चाचणी केंद्राची सुविधा करण्यात आली आहे. फरीदाबाद क्षेत्रातले अशा प्रकारचे पहिले आणि एकमेव चाचणी केंद्र आहे. फरिदाबादच्या ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा विस्तार कक्ष म्हणून हे निदान  केंद्र काम करणार आहे.

कोविड-19 च्या निदान चाचणीसाठी प्रयोगशाळेत आवश्यक असणाऱ्या मनुष्य बळाला प्रशिक्षित करण्यासाठी आणि कोविड-19 च्या चाचणीसाठी ईएसआयसीच्या रुग्णालयाची क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असणारी मदत देण्यात आली आहे. यासंबंधी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्यातीने  ‘टीएचएसटीआय’च्या जैव-आमापन विभागाला वित्तीय मदत करण्यात येते. तर ईएसआयसी फरीदाबाद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या दोन्ही केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक वैद्यकीय संस्था आहेत.

'टीएचएसटीआय'च्या जैव-आमापन विभागाच्या प्रयोगशाळेची स्थापना ‘टीएचएसटीआय’ला देण्यात आलेल्या अनुदानातून करण्यात आली आहे. जागतिक निकषांची पूर्तता करणाऱ्या वैद्यकीय लसी आणि जैविकांचा विकास करण्यासाठी या प्रयोगशाळेचा वापर करण्यात येतो. आता या प्रयोगशाळेला राष्ट्रीय मान्यता मंडळाची मंजुरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात येणार आहे. 

आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अंतर्गत नसलेल्या ज्या सरकारी प्रयोगशाळांमध्ये विविध प्रकारचे संशोधन केले जाते त्यांचा विस्तार करण्यासंबंधी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. तसेच या संस्थांमध्ये चाचणी सुविधा केंद्र तयार करण्याचा समावेश या करारामध्ये आहे. त्यानुसार  जैवतंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि सरकारी अनुदानावर चालणारी वैद्यकीय महाविद्यालये आणि इतर संस्थांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

(संपर्क – डॉ. सिउली मित्रा - smitra@thsti.res.in)

 

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1613580)