संरक्षण मंत्रालय
कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात पोर्ट ब्लेअरमध्ये भारतीय नौदलाची सज्जता
Posted On:
12 APR 2020 12:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2020
कोविड -19 महामारीच्या काळात नेव्हल एअर स्टेशन (एनएएस) उतक्रोश आणि मटेरियल ऑर्गनायझेशन (पोर्ट ब्लेअर) यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये गरजू लोकांपर्यंत पोहोचून अन्न वितरण केले.
या नौदलाच्या हवाई तळाच्या पायाभूत विकासासाठी काम करणाऱ्या 155 मजुरांसाठी एनएएस उतक्रोश यांनी अन्न वितरण शिबिर आयोजित केले होते. हे कामगार सध्या हवाई तळाच्या परिसरात राहत आहेत.
पोर्ट ब्लेअरच्या सदस्यांच्या पथकाने वनवासी कल्याण आश्रमाला भेट दिली आणि मुलांना व कर्मचाऱ्यांना शिजवलेले जेवण आणि कोरड्या खाऊच्या सामानाचे वाटप केले. वनवासी कल्याण आश्रम ही आदिवासी मुलांना अन्न आणि निवारा देणारी, ना नफा तत्वावर काम करणारी संस्था आहे. संस्थेच्या पोर्ट ब्लेअरमध्ये असलेल्या केंद्रात सुमारे 38 मुले राहतात. ही संस्था पोर्ट ब्लेअर येथे वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या गरीब आदिवासी कुटुंबांना निवासाची सुविधा उपलब्ध करुन देते.
या पथकाने कोविड-19 विषयीची माहिती देण्याबरोबरच या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन दरम्यान कोणती खबरदारी घ्यावी याविषयी मुले आणि कर्मचाऱ्यांचे प्रबोधन केले आहे.
B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar
(Release ID: 1613550)
Visitor Counter : 194
Read this release in:
English
,
Assamese
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada