आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 सद्यस्थिती
Posted On:
10 APR 2020 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2020
देशामध्ये कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव रोखण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी भारत सरकारने राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यावर अतिशय उच्च स्तरावरून देखरेख केली जात आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज कोविड-19 व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजना आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री, मुख्य सचिव/ आरोग्य सचिव यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे देखील उपस्थित होते.
देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात निव्वळ कोविड-19 वर उपचार करणारी समर्पित रुग्णालये असली पाहिजेत आणि शक्य तितक्या लवकर त्यांना अधिसूचित करावे जेणेकरून लोकांना त्याची माहिती मिळू शकेल, अशी सूचना हर्षवर्धन यांनी केली. कोणत्या श्रेणीतील आरोग्य कर्मचारी/ व्यावसायिक यांनी कोणत्या प्रकारच्या पीपीईचा वापर करावा याबाबतची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (www.mohfw.gov.in) उपलब्ध आहेत आणि त्यांचा व्यवहार्य वापर करण्याबाबत देखील राज्यांनी जागरुकता निर्माण केली पाहिजे. रुग्णालयांच्या विविध भागांमध्ये पीपीईंचा योग्य वापर कशा प्रकारे करायचा याबाबत मार्गदर्शन करणारा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे आणि तो https://www.youtube.com/watch?v=LzB5krucZoQ&feature=youtu.be येथे उपलब्ध आहे.
भारत सरकारने 15000 कोटी रुपयांचे इंडिया कोविड-19 आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य प्रणाली सज्जता पॅकेजला मंजुरी दिली आहे. या निधीचा वापर कोविड-19 च्या रुग्णांवर उपचारांसाठी आणि कोविड-19 वर प्राथमिक भर देत वैद्यकीय पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी करण्यात येईल. यामुळे कोविड-19 च्या चाचणी केंद्रात वाढ होऊ शकेल आणि त्याचा वापर पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई), विलगीकरण खाटा, आयसीयू खाटा, व्हेंटिलेटर आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय सामग्रीची खरेदी आणि वैद्यकीय व निमवैद्यकीय मनुष्यबळाच्या प्रशिक्षणासाठी करता येईल. पीपीई उत्पादनासाठी 39 देशांतर्गत उद्योगांना तैनात केले असून भारत सरकारने सर्व राज्यांमध्ये आपल्या आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीईंचा पुरेशा प्रमाणात पुरवठा व्हावा यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत.
राज्यांना सुमारे 20.4 लाख N-95 मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे आणि यापुढच्या काळात मागणी पुरवण्यासाठी आणखी जास्त मास्कची खरेदी प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. तसेच 49000 व्हेंटिलेटरची मागणी नोंदवण्यात आली आहे आणि भविष्यातील गरजांचा आढावा घेतला जात आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने रक्त आणि रक्तातील घटकांचा पुरेसा पुरवठा कायम राखण्यासाठी रक्त संक्रमण आणि स्वेच्छेने रक्तदानासंदर्भात, विशेषतः त्या रुग्णांसाठी ज्या रुग्णांसाठी रक्त संक्रमण जीवन रक्षक उपाय असेल त्यांना विचारात घेऊन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे https://www.mohfw.gov.in/pdf/NBTCGUIDANCEFORCOVID19.pdf येथे उपलब्ध आहेत.
त्याशिवाय, हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या सुमारे एक कोटी गोळ्यांची गरज (कोविड-19च्या रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी, आयसीयूतील रुग्ण आणि उच्च जोखीम असलेले संपर्क यांच्यासह) असल्याच्या अंदाजाच्या तुलनेत, आपल्याकडे सध्या 3.28 कोटी गोळ्या उपलब्ध आहेत. हा साठा देशात स्थानिक वापराच्या गरजेच्या तिप्पट आहे. त्या व्यतिरिक्त सुमारे दोन ते तीन कोटी गोळ्यांचा आणखी साठा करण्यात आला आहे.
गरोदरपणा आणि प्रसूती व्यवस्थापन याबाबत देखील एम्सकडून त्यांच्या वेबिनारचा एक भाग म्हणून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि हे मार्गदर्शन:
https://www.youtube.com/watch?v=MJwgi1LCu8o&feature=youtu.be येथे उपलब्ध आहे.
आतापर्यंत 146 सरकारी प्रयोगशाळा, 16000 हून जास्त संकलन केंद्रांसह 67 खाजगी प्रयोगशाळांची चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. 9 एप्रिल 2020 रोजी सुमारे 16002 चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी 320 जण पॉझिटिव्ह सापडले (सुमारे 2%). मात्र, या आकडेवारीत दररोज संकलित नमुन्यांनुसार बदल होत असतो.
आतापर्यंत देशात पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 6412 झाली असून त्यापैकी 199 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. 503 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
कोविड-19 शी सबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक सूचना आणि नियमावली संदर्भात अधिकृत आणि ताजी माहिती मिळवण्यासाठी नियमितपणे पुढील संकेतस्थळाला भेट द्या. https://www.mohfw.gov.in/.
कोविड-19 शी सबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in या ईमेलवर आणि इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in या ईमेलवर पाठवता येतील.
कोविड-19 बाबत कोणतीही शंका दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला फोन करा. हेल्पलाईन क्रमांक: +91-11-23978046 किंवा 1075 (टोल फ्री).
राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf या ठिकाणी देखील उपलब्ध आहे.
B.Gokhale/S.Patil/D.Rane
(Release ID: 1613145)
Visitor Counter : 159
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam