रेल्वे मंत्रालय
प्रवासी रेल्वेसेवा पूर्ववत सुरु होण्याबाबत प्रसार माध्यमातील बातम्यांच्या अनुषंगाने माध्यमांसाठी मार्गदर्शक सूचना
Posted On:
10 APR 2020 3:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2020
प्रवासी रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरु होण्याबाबतच्या बातम्या गेल्या दोन दिवसामध्ये माध्यमात झळकत आहेत. अमुक तारखेपासून किती गाड्या सुरु होतील याविषयीसुद्धा माध्यमांनी वृत्त दिले आहे.
माध्यमांना सूचित करण्यात येत आहे कि यासंबंधी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसून त्याआधीच अशा प्रकारचे माध्यमांनी केलेले वृत्तांकन हे सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांमध्ये निष्कारण संभ्रम निर्माण करीत आहे.
माध्यमांना कळकळीची विनंती आणि सल्ला आहे कि त्यांनी खात्री केल्याशिवाय किंवा सत्यासत्यता पडताळल्याशिवाय बातम्या देऊ नयेत जेणेकरून असे संभ्रम निर्माण होणार नाहीत.
लॉकडाउननंतरच्या रेल्वे प्रवासासाठी रेल्वे संभाव्य प्रवाश्यांसह सर्व हितसंबंधितांसाठी योग्य तो निर्णय घेईल.
निर्णय झाल्यावर सर्व संबंधितांना तो कळविला जाईल.
G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane
(Release ID: 1612902)
Visitor Counter : 200
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam