शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय चाचणी संस्थेने जेजेई (मुख्य) 2020 परीक्षेच्या ऑनलाईन अर्जामध्ये परीक्षा केंद्राचे शहर निवडीच्या दुरुस्तीची मुदत वाढ

Posted On: 09 APR 2020 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020

 

कोविड - 19ची सद्यपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि जेईई (मुख्य) 2020 परीक्षेच्या इच्छुकांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशांक यांनी राष्ट्रीय चाचणी संस्थेला जेजेई (मुख्य) 2020 परीक्षेच्या ऑनलाईन अर्जामध्ये परीक्षा केंद्राचे शहर निवडीच्या दुरुस्तीला मुदतवाढ देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार जेईई (मुख्य) 2020 साठी ऑनलाईन अर्जातील दुरुस्ती सुविधे संदर्भात राष्ट्रीय चाचणी संस्थेने 1 एप्रिल 2020 रोजी जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेच्या अनुषंगाने एनटीए ने आज अर्जात दुरुस्ती करण्याच्या सुविधेची व्याप्ती वाढवत यामध्ये आता परीक्षा केंद्राच्या शहरांच्या निवडीचा देखील समावेश केला आहे.

एनटीए इच्छित शहरांतील क्षमतेच्या उपलब्धतेनुसार, उमदेवारांनी त्यांच्या अर्जात निवडलेल्या शहर क्रमवारीनुसार परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न करेल. असे असले तरीदेखील, प्रशासकीय कारणास्तव उमेदवाराने निवड केलेल्या शहराव्यतिरिक्त इतर शहर देखील दिले जाऊ शकते याबाबतीत एनटीए चा निर्णय अंतिम असेल.

जेईई (मुख्य) - 2020  च्या सर्व उमेदवारांच्या निदर्शनास आणून दिले आहे की, ऑनलाईन अर्जाच्या नमुन्यात केंद्रासाठी शहरे निवडण्यासह तपशील दुरुस्त करण्याची सुविधा आता https://jeemain.nta.nic या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि हीच सुविधा एनआयसी 14/04/2020 * पर्यंत उपलब्ध असेल.

ऑनलाईन अर्जामधील तपशीलांमधील सुधारणा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील आणि रात्री 11.50 पर्यंत शुल्क स्वीकारले जाईल.

आवश्यक असल्यास (अतिरिक्त) शुल्क क्रेडिट, डेबिट कार्ड / नेट बँकिंग / यूपीआय आणि पेटीएमद्वारे भरली जाऊ शकते.

जर फॉर्ममध्ये केलेल्या बदलांनुसार अतिरिक्त शुल्क भरणे आवश्यक असेल तर देय दिल्यानंतर अंतिम सुधारित बदल दिसून येतील.

यापुढे दुरुस्तीची कोणतीही संधी दिली जाणार नाही म्हणून उमेदवारांना काळजीपूर्वक दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे.

ताज्या माहितीसाठी उमेदवारांना आणि त्यांच्या पालकांना jeemain.nta.nic.in आणि www.nta.ac.inवर भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिक स्पष्टीकरणासाठी उमेदवार 8287471852,8178359845,9650173668,9599676953,8882356803 वर संपर्क करू शकतात.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1612636) Visitor Counter : 143