रसायन आणि खते मंत्रालय

शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध- गौडा

Posted On: 09 APR 2020 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020

आगामी खरीप हंगामासाठी देशात पुरेसा खतांचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी रसायने आणि खत मंत्रालयाचा खत विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असा माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली आहे. आत्तापर्यंतची उपलब्धतेची स्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर पुरेशा प्रमाणात खतांची मात्रा पुरविण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. खतांची निर्मिती, वाहतूक आणि उपलब्धतेवर खत विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्या अनुषंगाने विविध राज्य सरकार तसेच रेल्वे मंत्रालयाच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कर्नाटकविषयी स्वतंत्र ट्विट करताना गौडा म्हणाले, "कर्नाटक राज्याचा विचार केला तर राज्यात बियाणे, खते आणि कीटकनाशकांची कमतरता नाही. यासंदर्भात आम्ही कर्नाटक सरकारशी सतत संवाद साधत आहोत. आजमितीस कर्नाटक सरकारकडे 7.3 लाख टन साठा आहे आणि त्यांची मासिक गरज ही 2.57 लाख टन आहे."

खत विभागाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्र उपक्रम नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड - NFL ने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की नांगल, भटिंडा, पानिपत बीट आणि विजापूर हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी युरिया बाजारपेठेत नियमितपणे पाठविण्यात येत आहे.

 

U.Ujgare/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1612618) Visitor Counter : 190