विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर-सीएफटीआरआय कोविड-19 च्या तपासणीसाठी चाचणी उपकरणे पुरवणार

Posted On: 07 APR 2020 10:14AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 एप्रिल 2020


म्हैसूरमध्ये कोरोना विषाणू बाधितांची संख्या 28 वर पोहोचली असून गेल्या 24 तासात सात रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या मीडिया बुलेटिननुसार ही आकडेवारी आहे. म्हैसूरच्या सीएसआयआर -सीएफटीआरआय अर्थात केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेने संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले आहे.

सध्या कोविड-19 संसर्ग तपासणी  रिअल टाइम पॉलीमेरेस चेन रिऍक्शन (पीसीआर) नावाच्या अत्यंत आधुनिक आणि अचूक तंत्राद्वारे केली जाते. या पद्धतीत पीसीआर मशीनचा वापर करून नमुन्यांमधून विषाणूचे आरएनए वेगळे काढले जातात आणि त्याचा आकार मोठा केला जातो. पीसीआर चाचणीचा स्पष्ट फायदा असा आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये अगदी प्रारंभिक टप्प्यातला म्हणजे नुसती लक्षणे आढळल्यावरही विषाणूचा शोध याद्वारे घेता येऊ शकतो.

म्हैसूर जिल्हा हा चार हॉट स्पॉट जिल्ह्यांपैकी एक म्हणून ओळखला गेला असून इथे मोठ्या प्रमाणात संशयित रुग्ण आहेत. विलगीकरण करण्यात आलेल्या संशयित व्यक्तींची त्यांच्यात संसर्गाची लक्षणे दिसत असली/नसली तरी संसर्ग तपासण्यासाठी विलगीकरण काळाच्या आधी आणि नंतर तपासणी केली जाणे आवश्यक आहे,

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नमुन्यांची चाचणी घेण्यासाठी सीएसआयआर-सीएफटीआरआय जिल्हा प्रशासनाला दोन पीसीआर मशीन आणि एक आरएनए एक्सट्रॅक्शन युनिट आवश्यक रसायनांसह पुरवत आहे.

“अचूक आणि योग्य चाचणी करणे ही काळाची गरज आहे. ही चाचणी अत्यंत अत्याधुनिक असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) चाचणीसाठी मंजूर केलेल्या निवडक केंद्रांमध्ये ती केली जात आहे आणि आम्ही क्षमता वाढवून सहकार्य करत आहोत, असे सीएसआयआर-सीएफटीआरआयचे संचालक डॉ. केएसएमएस राघवराव यांनी म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाच्या गरजेनुसार उपकरणाबरोबरच दोन कुशल तंत्रज्ञ देखील या काळात पुरवले जातील, असे  त्यांनी सांगितले.

पीसीआर मशीन्स 5 एप्रिल 2020 रोजी सुपूर्द करण्यात आली. विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेच्या (VRDL) नोडल अधिकारी आणि म्हैसूर. येथील म्हैसूर मेडिकल कॉलेज आणि रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेच्या प्रभारी डॉ. अमृता कुमारी यांनी ही उपकरणे स्वीकारली. यामुळे या केंद्राला दररोज चाचण्यांची संख्या तिप्पट करण्यात मदत होईल, असे त्या म्हणाल्या. आरएनए एक्सट्रॅक्शन युनिट आठवड्याभरात पोहोचेल.

 

 

KGS/(DST-(India Science wire)

U.Ujgare/S.Kane/D.Rane



(Release ID: 1611888) Visitor Counter : 218