मंत्रिमंडळ

कोविड -19 संपुर्ण यशस्वितेच्या व्यवस्थापनासाठी दोन वर्षासाठी खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी स्थगित करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 06 APR 2020 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020

 

कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या सुरु असलेल्या  प्रयत्नांचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, 2020-21  आणि 2021-22 या  दोन वर्षासाठी खासदार स्थानिक क्षेत्र  विकास निधी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.  हा निधी, देशात कोविड-19 चा प्रतिकूल  परिणाम आणि कोविड मुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठीचे  सरकारचे प्रयत्न बळकट करण्यासाठी उपयोगात आणला जाईल.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 (Release ID: 1611714) Visitor Counter : 163