सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

कोविड-19 विरूद्ध लढाईत एमएसएमई तंत्रज्ञान केंद्रांचे मोठे योगदान

Posted On: 05 APR 2020 2:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020

देश सध्या अनेक पातळ्यांवर  कोरोना विषाणूचा सामना करत आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) अंतर्गत स्वायत्त संस्था असलेली अठरा कार्यान्वित तंत्रज्ञान केंद्र देखील कोविड-19 विरूद्ध लढाईत बरोबर लढा देण्यासाठी आपली भूमिका पार पाडत मोठे योगदान देत आहेत.

चेन्नई येथील सेंट्रल फूटवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने (सीएफटीआय) मास्क आणि मेडिकल गाऊनच्या सिलिंग कामासाठी सीलिंग मशीन  बसवले आहे. या मशीनवर काम केल्यानंतर श्री हेल्थ केअर, चेन्नई हे आरोग्य मंत्रालयाचे मान्यताप्राप्त  पुरवठादार बनले आहेत.  4 एप्रिल 2020 पासून सुरू झालेले उत्पादन वाढवण्यासाठी सीएफटीआय चेन्नई आणखी दोन मशीन घेणार आहे.

हैदराबाद येथील एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर व्हेंटिलेटरचा एक प्रोटोटाइप विकसित करत आहे. हे सेन्सरवर आधारित इलेक्ट्रो मेकॅनिकल व्हेंटिलेटर आहे. पहिले प्रोटोटाइप लवकरच तयार होईल. औरंगाबादच्या एसएमईटीसीने फेस मास्कचा थ्रीडी प्रोटोटाइप विकसित केला आहे. हे वैधतेसाठी स्थानिक रुग्णालयाच्या संपर्कात आहे.

कोलकाताचे सेंट्रल टूल रूम अँड ट्रेनिंग सेंटर (सीटीटीसी) सागर दत्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलशी सल्लामसलत करून एक साधी आणि कमी किंमतीची व्हेंटिलेटर प्रणाली विकसित करत आहे. त्यांनी  त्याची चाचणी करायला  सहमती दर्शविली आहे आणि वापरायच्या आधी देखील त्याचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. काही न्यूमॅटिक सामुग्री ऑनलाईन मागवण्यात आली असून प्रोटोटाईपच्या  अंतिम असेंब्लीसाठी प्रतीक्षा केली जात आहे. त्यांनी फेस शिल्ड प्रोटोटाइप विकसित केला आहे. याचे 15 ते 20 रुपये प्रति नग प्रमाणे (दरमहा 20000) उत्पादन  सुरू होईल.

कन्नौज येथील एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटरने अल्कोहोल आधारित सॅनिटायझर्सचे उत्पादन सुरू केले आणि ते फर्रुखाबादच्या डीएमला पुरवले.  रेल्वे आणि इतर संस्थांना देखील ते पुरवण्यात येणार आहे.

इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स (आयडीईएमआय) इऑन आधारित सॅनिटायझर विकसित करत आहे. याचे देखील बीएआरसीमध्ये संशोधन सुरु आहे. हे यशस्वी झाल्यास त्याचा अनेक प्रकारे वापर केला जाईल.

हैदराबाद, भुवनेश्वर आणि जमशेदपूर येथील एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर, 650 कोरोना टेस्टिंग किटसाठी सुटे भाग तयार करणार आहेत. प्रत्येक किटमध्ये 20 हार्डवेअर घटक असतात. घटकांचा पहिला भाग भुवनेश्वर येथे लवकरच तयार होईल. एकदा त्याला मंजुरी मिळाल्यानंतर विविध केंद्रांवर उत्पादन सुरु  होईल.

एएमटीझेडला व्हेंटिलेटरसाठी 10000 घटकांची आवश्यकता असते. प्रेस टूल्स  तयार करण्यासाठी ड्रॉइंग्स पाठवण्यात आली आहेत. भुवनेश्वर तंत्रज्ञान केंद्र येथील व्यवस्थापकीय संचालकांनी टूल्स आणि सुटे भाग तयार करण्याचे काम विविध केंद्रांना उदा. सीटीआर, लुधियाना, आयडीईएमआय, इंडो जर्मन टूल रूम (आयजीटीआर), औरंगाबाद, कोलकाता आणि आयडीटीआर, जमशेदपूर दिले आहे. हे काम जलद गतीने करण्याची विनंती त्यांना करण्यात आली आहे.

ईएसटीसी रामनगरने आयव्ही स्टँडची रचना केली आहे. GeM वर नोंदणी करण्यासाठी कोविड उत्पादनांसाठी 70 mfrs ला प्रोत्साहन देण्यात आले आहे.  ईएसटीसी वसतिगृह 80 स्थलांतरित कामगारांसाठी निवारा गृह म्हणून रूपांतरित करण्यात आले. भिवंडी आणि  जमशेदपूर येथील एमएसएमई तंत्रज्ञान केंद्रांनी अलगीकरण केंद्रांची स्थापना करण्यासाठी रिकाम्या खोल्या उपलब्ध करुन दिल्या.

आग्रा येथील प्रक्रिया आणि उत्पादन विकास केंद्र (पीपीडीसी) आणि इंदूर येथील आयजीटीआर संयुक्तपणे रुग्णालयातील फर्निचरसाठी योजना आखत आहेत. संरचनेचे तपशील तयार करण्याचे काम चालू आहे. मेरठ येथील पीपीडीसीने  फेस मास्क टायर केले असून विनामूल्य वितरित केले. आग्रा येथील सीएफटीआयने मेसर्स रॅमसनसाठी मेडिकल गाऊन तयार केले आहेत. ते  ट्रिपल लेयर्ड फेस मास्क देखील बनवणार आहेत.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1611524) Visitor Counter : 230