संरक्षण मंत्रालय
परदेशातील "पहिले लढाऊ नौका प्रशिक्षण" पूर्ण करून एनसीसीचे प्रशिक्षणार्थी आयएनएस तीरवरून परतले
Posted On:
05 APR 2020 6:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020
भारतीय नौदलाच्या दक्षिणी नौदल कमांड (एसएनसी) अंतर्गत देशातील विविध भागातील 14 नेव्हल विंग एनसीसी कॅडेटसह (राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसह) प्रशिक्षण नौका आयएनएस तीर ही परदेशातील "पहिले लढाऊ नौका प्रशिक्षण" पूर्ण झाल्यावर कोचीला परतली आहे.
भारतीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी 29 फेब्रुवारी 2020 रोजी आयएनएस तीरमधून प्रवास सुरु केला. त्यांना समुद्री जीवनातील विविध पैलू साचेबद्ध प्रशिक्षणाद्वारे उलगडून दाखविण्याबरोबरच भारतीय नौदलाची भूमिका समजावून सांगण्यावर भर देण्यात आला.
प्रशिक्षणार्थीनी नौकेवरील सर्व कामांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. कॅडेट्सनी जहाजावरील सर्व कामांमध्ये उत्साहाने भाग घेतला. मॉरिशसच्या पोर्ट लुईस येथील वृद्धाश्रमाला त्यांनी भेट दिली आणि त्यांच्या उत्साहपूर्ण आणि ममत्वाच्या स्पर्शाने त्या जेष्ठांकडून प्रशंसा प्राप्त केली. कोविड- 19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भेटीगाठींवर मर्यादा होत्या. त्या नौकेवर असलेल्या भारतीय नौदल अधिकाऱ्यांशी तसेच मालदीव, सेशेल्स, बांगलादेश, श्रीलंका आणि म्यानमारमधील प्रशिक्षणार्थी तसेच भारतीय नौदल अधिकाऱ्यांशी नियमित संवाद साधून या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर पहिला लढाऊ नौका प्रशिक्षण कार्यक्रम आटोपता घेऊन14 दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करून ही नौका 4 एप्रिल 2020 रोजी बंदरात पोहोचली. नौकेवर असताना नियमानुसार सामाजिक अंतर ठेवणे शक्य नसल्यामुळे संपूर्ण नौकेचे विलगीकरण करण्यात आले होते. सावधगिरीचा उपाय म्हणून या नौकेवरील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रशिक्षणार्थीना अतिरिक्त 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

U.Ujgare/V.Joshi/P.Kor
(Release ID: 1611468)
अभ्यागत कक्ष : 140