PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेबाबत या आरोग्य कर्मचाऱ्यांना राज्यांनी माहिती द्यावी – आरोग्य मंत्रालय

विषाणूने आपला माग घेण्याआधीच आपण त्याचा माग घेण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, तत्पर पावले उचलण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. कोविड-19  शी लढणाऱ्या योद्ध्यांप्रती आदर भावना व्यक्त करण्यासाठी आज रात्री 9 वाजता दीप प्रज्वलित करावा– आरोग्य मंत्रालय

Posted On: 05 APR 2020 7:09PM by PIB Mumbai

 

आरोग्य मंत्रालयाची COVID2019 घडामोडींवर पत्रकार परिषद 

देशात कोविड-19 ची लागण झाल्यामुळे आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू झाला आहे, गेल्या 24 तासात, 472 नवे बाधित असून, 11 जण मरण पावले आहेत, आतापर्यंत 267 जण कोविड संसर्गातून बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव श्री लव अगरवाल यांनी दिली.

श्री अगरवाल यांनी या परिषदेत खालील माहिती दिली.

  • कोविड-19 ची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा काळ सध्या 4.1 दिवस आहे. तबलिगी जमात प्रकरणामुळे अतिरिक्त केसेस आल्या नसत्या तर हा काळ 7.4 दिवस राहिला असता.
  • कॅबिनेट सचिवांनी, सर्व राज्यांचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव आणि जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. वैद्यकीय साधनांचे उत्पादन सुरळीत राहील हे सुनिश्चित करण्याचे आवाहन केले, तसेच संसर्ग रोखण्यासाठीच्या रणनीतीबाबत मार्गदर्शन केले.
  • संसर्ग रोखण्यासाठीच्या रणनीतीची तत्पर आणि कठोर अंमलबजावणी. सज्जता आणि काही प्रमाणात अति सज्जता ही व्यूहरचना असेल. कोविड-19 शी लढा देतानाच्या आपल्या अनुभवांची जिल्ह्यांनी देवाण घेवाण केली, यामुळे, इतर जिल्ह्यांना उत्तम प्रथांचा उपयोग करता येणे शक्य होईल.
  • संसर्ग ग्रासित आणि बफर झोन ठरवणे, घरोघरी सर्वेक्षण आणि संपर्कातील व्यक्ती शोधणे, टेलीमेडिसिन आणि कॉल सेंटरचा वापर करत प्रवाश्यांवर देखरेख, जास्त धोका असलेल्या आणि वृद्धांची संख्या जास्त असलेल्या भागात लक्ष ठेवणे, खाजगी रुग्णालयांची क्षमता वृद्धी, आदी अनुभव कॅबिनेट सचिवांसमवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कथन केले.
  • आतापर्यंत 274 जिल्ह्यात कोविड -19  चे बाधित रुग्ण आढळले आहेत. कोविड महामारीला एकसमान प्रतिसाद राहावा यादृष्टीने, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी, जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे कॅबिनेट सचिवांचे निर्देश
  • आतापर्यंत 274 जिल्ह्यात कोविड -19 चे रुग्ण आढळले आहेत. कोविड महामारीला एकसमान प्रतिसाद राहावा यादृष्टीने, जिल्हाधिकाऱ्यांनी, जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे कॅबिनेट सचिवांचे निर्देश
  • देशात, कोविड-19 च्या प्रतिसाद कृतीच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या अधिकारप्राप्त गटांची संयुक्त बैठक, पंतप्रधानांनी काल घेतली.
  • दाट लोकवस्ती भागात, स्थलांतरित मोठ्या संख्येने गोळा आहेत अशा भागात, निर्वासित केंद्रात कोविड-19  ची रॅपिड अँटीबॉडी आधारित रक्त चाचणी करण्याबाबत, आयसीएमआर  ने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे, कोविड-19 चा प्रसार वाढू शकतो असे नमूद करणारी सुचनावली आयसीएम आर कडून जारी. धुम्रविरहित तंबाखू उत्पादने चघळल्याने लाळ उत्पन्न होते आणि थुंकण्याची प्रबळ इच्छा होते असे आयसीएमआर ने म्हटले आहे
  • कोविड-19  विरुद्धच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना - विमा योजनेबाबत या आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी असे आरोग्य मंत्रालयाचे राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र
  • केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी काल एलएनजेपी रुग्णालयाला भेट देऊन कोविड-19 शी लढा देण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला होता, आज झज्जर  एम्स ला त्यांनी भेट दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती देश ऋणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि सोशल डिस्टनसिंगचे महत्व अधोरेखित केले.
  • 24 राज्यातल्या 399 जिल्ह्यातल्या 14,500 स्वयं सहाय्यता गटांच्या 66,000 सदस्यांनी कोविड-19 शी लढा देण्यासाठी, फेस मास्क निर्मितीच्या कामाला सुरुवात केली आहे.
  • वाहतूक,ऊर्जा आणि इतर महत्वाचा पायाभूत पुरवठा सुरळीत राखण्यासाठी, 3 एप्रिल पर्यंत भारतीय रेल्वेने 2.5 लाख वॅगन हुन अधिक कोळसा,17,700 वॅगन हुन अधिक पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक केली.
  • पेरणी आणि कापणीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकार लक्ष पुरवत आहे, कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी, लॉकडाऊन च्या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
  • आयुष्मान भारत लाभार्थीच्या हितासाठी, आदेश जारी करण्यात आला आहे, त्यानुसार खाजगी रुग्णालयातून मोफत चाचणी  आणि सुचिबद्ध रुग्णालयातून कोविड-19 वर उपचार घेणे शक्य
  • विषाणूने आपला माग घेण्याआधीच आपण त्याचा माग घेण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, तत्पर पावले उचलण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. कोविड-19  शी लढणाऱ्या योद्ध्यांप्रती आदर भावना व्यक्त करण्यासाठी आज रात्री 9 वाजता दीप प्रज्वलित करण्याची आमची विनंती आहे
  • काही ठिकाणी औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्याना आवश्यक मालासाठी समस्या येत आहेत हे लक्षात घेऊन, गृह सचिवांनी, राज्यांना, अशा महत्वाच्या युनीटना सहकार्य करण्याचे आणि कामगारांची आंतर राज्य ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी, आदर्श कार्यान्वयन पद्धती आखण्याचे निर्देश दिले.
  • राज्यांमध्ये,स्थलांतरित मजुरांसाठी, एकूण 27,661 मदत छावण्या आणि निवारे उभारण्यात आले आहेत, त्यामधे, 12.5 लाख लोकांनी आसरा घेतला आहे. याशिवाय, 19,460 अन्न छत्र उभारण्यात आली आहेत, यामध्ये 75 लाख लोकांना अन्न पुरवण्यात येत आहे.
  • दाट लोकवस्ती आणि मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आहेत अशा ठिकाणी आणि जिथे मोठ्या प्रमाणात प्रकरणांची नोंद झाली आहे अशा ठिकाणच्या प्रकरणांवर उत्तम  देखरेख करणे हा रॅपिड अँटिबॉडी आधारित रक्त चाचणीचा हेतू आहे.
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने, राज्यांसाठी विभाग अधिकारी नेमले असून, आवश्यक वस्तूंचा पुरवठा तरतुदींबाबतच्या मुद्य्यांचे निराकरण, राज्ये आणि संबंधितांशी समन्वय साधून हे अधिकारी करतील.
  • पीपीईचा पुरवठा आम्ही वाढवत आहोत, देशातले उत्पादन सुरू असून, जगातूनही आम्ही खरेदी करत आहोत, लोकोपकारी संस्थाही यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहेत, राज्यांनी पीपीई चा तर्कसंगत वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.    

 

 

@PIBMumbai चे प्रेस कॉन्फरन्सचे लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Other updates:

महाराष्ट्रातील अपडेट्स

महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित संख्या 690 झाली आहे. यात मुंबई 29,पुणे 17, पिंपरी चिंचवड 04, अहमदनगर 03,औरंगाबाद 02 अशी 55 रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत 56 सदस्य बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

https://pbs.twimg.com/profile_banners/231033118/1584354869/1500x500

 

***

DJM/RT/MC/PK



(Release ID: 1611435) Visitor Counter : 254