PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

बाधितांची संख्या दुप्पट होण्याचा वेग भारतात तुलनेने कमी, मात्र आपण दक्ष राहण्याची गरज- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अधिकारप्राप्त गटांच्या बैठकीत कोविड-19 चा मुकाबला करण्यासंदर्भातल्या तयारीचा घेतला देशव्यापी आढावा

Posted On: 04 APR 2020 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली-मुंबई, 4 एप्रिल 2020

 

देशात कोविड-19 प्रतिसाद कृतीबाबत, नियोजन आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या अधिकार प्राप्त गटांची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर, देशातल्या रुग्णालयांची उपलब्धता, योग्य विलगीकरण व्यवस्था, रोगासंदर्भात देखरेख व्यवस्था, निदान, देखभाल प्रशिक्षण याबाबत देशव्यापी आढावा घेतल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

 

आरोग्य मंत्रालयाची COVID2019 घडामोडींवर पत्रकार परिषद 

देशातल्या कोरोना बाधितांची संख्या आता 2,902 झाली आहे कालपासून 601 बाधित झाले आहेत. एकूण 68 जण मृत्यूमुखी पडले असून गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला. 183 कोरोनाबधित यातून बरे झाले. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव श्री लव अगरवाल यांनी दिली.

श्री अगरवाल यांनी या परिषदेत खालील माहिती दिली.

 • आरोग्य व्यावसायिक, आयुष डॉक्टर, एनसीसी, लष्कराचे निवृत्त अधिकारी, एनएस एस, आणि एनवायके स्वयंसेवक, स्थानिक संस्थांचे कर्मचारी, कोविड-19  विरुद्धच्या  लढ्यात सक्रिय सहभागी आहेत. कोविड-19 विरुद्धच्या देशाच्या लढयात, 31,000 पेक्षा जास्त निवृत्त डॉक्टरांनी, स्वेच्छेने आपली सेवा देऊ केली आहे
 • कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात, रुग्णालय व्यवस्थापनात, निवासी डॉक्टर, पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी यांना कसे सहभागी करून घेता येईल यासाठी आम्ही  सुचनावली तयार केली आहे.
 • बाधितांची संख्या वाढल्यास अशी परिस्थिती कशी हाताळता येईल? कोविड 19 चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास, तो आटोक्यात आणण्यासाठी आम्ही कृती आराखडा तयार केला आहे.
 • चेहरा आणि तोंड झाकण्यासाठी, घरी तयार केलेल्या संरक्षक कव्हरच्या वापराबाबत आम्ही सुचनावली जारी केली आहे.
 • व्हेंटिलेटर सपोर्ट, क्लिनिकल व्यवस्थापन, विलगीकरण व्यवस्थापन, संसर्ग रोखणे आणि नियंत्रण यासारख्या बाबींवर 30 प्रशिक्षण मॉड्युल तयार करण्यात आली असून राज्यांना पुरवण्यात येत आहेत. 1.6 लाख लोकांनी याचा उपयोग केला आहे, 1.4 लाख लोकांना या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 • एअर इंडिया, अलायन्स एअर, भारतीय हवाई दल आणि खाजगी विमान कंपन्या यांनी लाइफलाईन उडान अंतर्गत 97 विमानांनी, ईशान्य भागात आणि डोंगराळ भागासह राज्यांना 119 टन वैद्यकीय सामग्रीची वाहतूक केली आहे.
 • एकूण 2,902 बाधित, कालपासून 601 बाधित. एकूण 68 जणांचा मृत्यू, कालपासून 12 जण मृत्युमुखी. 183 जण संसर्गातून बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
 • भारतातल्या कोविड-19 बाधितांची, वयानुसार आकडेवारी, आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने पुढीलप्रमाणे दिली आहे, 9% केसेस: 0-20 वर्षे; 42% केसेस: 21-40 वर्षे; 33% केसेस: 41-60 वर्षे; आणि 17% केसेस:  60 वर्षावरील. कोविड-19 महामारी विरोधातल्या लढ्यात, सरकार कोणती प्रक्रिया उपयोगात  आणत आहे, हे माध्यम आणि जनतेने जाणावे ही विनंती.
 • केरळ, मध्य प्रदेश आणि दिल्ली मध्ये सुमारे 58 गंभीर आहेत. वृद्धावस्था आणि इतर विकारांनी ग्रस्त हे महत्वाचे धोकादायक घटक. ज्यांना जास्त धोका आहे अशा व्यक्तींनी सरकारच्या, सर्व मार्गदर्शक तत्वांचे 100 टक्के तंतोतंत पालन करावे.
 • जगभरात,कोविड-19 चे 9.72 लाख बाधित आढळले असून, 75,800 हुन अधिक प्रकरणे केवळ एक दिवसात आढळली आहेत. सरकारचा प्रतिसाद तत्पर आणि श्रेणीबद्ध आहे, बाधितांची संख्या दुप्पट होण्याचा वेग भारतात तुलनेने कमी आहे, मात्र आपण दक्ष रहायला हवे.
 • 17 राज्यात तबलिग जमातशी संबंधीत प्रकरणे आढळली असून, त्यापैकी 1023 पॉझिटिव्ह आहेत, अशा प्रकारे, भारतात आतापर्यंत नोंद झालेल्यापैकी 30% प्रकरणे, एका ठिकाणाशी संबंधित आहेत. व्यापक प्रयत्नातून, तबलिग जमातशी संबंधित 22000 कार्यकर्ते आणि त्यांच्या संपर्कातल्या व्यक्तींचे आतापर्यंत विलगीकरण करण्यात आले आहे.  
 • वैद्यकीय साधनांची आणि सामग्रीची खरेदी करण्यात येत आहे, आवश्यकतेनुसार त्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. उपलब्धतेत उत्तरोत्तर वृद्धी होत असून, राज्यांनी या साहित्याचा सर्वोत्तम पद्धतीने वापर करावा अशी विनंती करण्यात येत आहे.
 • प्रत्येक ठिकाणी, आपण सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे, लॉकडाऊनचे आणि सोशल डिस्टनसिंगचे तसेच स्वच्छतेचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्याला माहिती असली पाहिजे, आपण दक्ष असले पाहिजे, घाबरलेले किंवा गोंधळलेले नव्हे.
 • राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत, केंद्राने, 11,092 कोटी रुपयांचा पहिला हप्ता, राज्यांसाठी जारी केला आहे, स्थलांतरित मजूरांच्या कल्याणासाठी किंवा आपत्तीशी संबंधीत गरजांची पूर्तता करण्यासाठी, राज्ये याचा उपयोग करू शकतात.
 • आवश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी, गृह मंत्रालयाने,21 दिवसांच्या लॉक डाऊन मार्गदर्शक तत्वांसंदर्भात परिशिष्ट जारी केले आहे.
 • गृह मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र सुरू असून, गृह मंत्रालय, केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, एनडीआरएफ, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय राखत, येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम करत आहेत.
 • मास्क वापरण्याबाबत आधी जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे कायम राहतील, नुकतीच जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे, घरी तयार केलेल्या चेहरा, तोंड झाकणाऱ्या कव्हर विषयी आहेत, वैयक्तिक आरोग्य काळजी घेण्यावर यात भर देण्यात आला असून, दाट लोकवस्ती भागात वापरण्यासाठी हे कव्हर उपयुक्त आहे
 • आदरणीय पंतप्रधानांनी नागरिकांना 5 एप्रिलला रात्री 9.00 ते 9.09 च्या दरम्यान स्वयंस्फूर्तीने आपल्या घरातले वीजेचे दिवे बंद करण्याचे आवाहन केले आहे.  यादरम्यान, स्वेच्छेने दिवे बंद करण्यामुळे, विद्युतदाबात चढ- उतार तसेच विद्युत ग्रीड मध्ये अस्थिरता निर्माण होण्याविषयी उपस्थित करण्यात येत असलेल्या शंका अनाठायी आहेत, अल्कोहोल युक्त सॅनिटायझर हाताला लावून त्या हाताने मेणबत्या आणि दीप प्रज्वलित करू नका.- प्रधान महासंचालक पत्र सूचना कार्यालय  
 • पीपीई आणि इतर वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा वाढवण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढवण्याबरोबरच, जगातही आम्ही यासाठी शोध घेत आहोत, आवश्यक लॉजीस्टिक पुरवण्यावर आमचा भर आहे, आम्ही मागणी नोंदवली असून पुरवठा सुरू होत आहे.
 • आम्ही निदान क्षमता वाढवत असून 2.5  महिन्यांपूर्वी  1 प्रयोगशाळे पासून सुरुवात करून आज 100 हुन अधिक  प्रयोगशाळा आहेत, खाजगी क्षेत्रालाही आम्ही समाविष्ट करून घेतले आहे.

@PIBMumbai चे प्रेस कॉन्फरन्सचे लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Other updates:

***

 

DJM/RT/MC/DR

 (Release ID: 1611173) Visitor Counter : 93