PIB Headquarters

येत्या 5 एप्रिलला रात्री 9 वाजता घरातील सर्व विजेचे दिवे बंद करून घराच्या दरवाज्यात किंवा बाल्कनीत उभे राहून 9 मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाइलचा फ्लॅशलाइट पेटवण्याचे पंतप्रधानांचे आवाहन


आरोग्य व्यावसायिक आणि कोविड-19 विरोधातल्या लढ्यात आघाडीवर असलेल्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे राज्यांना निर्देश

Posted On: 03 APR 2020 7:20PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई 3, एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करोना महामारी विरुध्द लढा देताना देशाच्या नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अंधारातून निरंतर प्रकाशाकडे जाण्यासाठी, निराशेकडून आशेकडे जाण्यासाठी येत्या 5 एप्रिलला रात्री 9 वाजता घरातील सर्व विजेचे दिवे बंद करून घराच्या दरवाज्यात किंवा बाल्कनीत उभे राहून 9 मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा,टॉर्च किंवा मोबाइलचा फ्लॅशलाइट पेटवण्याचे आवाहन केले.

जेणेकरून आपल्याला प्रकाशाच्या त्या महाशक्तीची जाणीव होईल, ज्यातून आपण एकाच ध्येयाने लढत आहोत ही भावना दिसून येईल. यावेळी त्यांनी विनंती केली की या आयोजनाच्या वेळी कुणीही कुठेही एकत्र जमायचे नाही, रस्त्यांवर, गल्लीमध्ये किंवा नाक्यावर जायचे नाही, आपल्या घराच्या दरवाजात, बाल्कनीत उभे राहून हे करायचे. सोशल डिस्टन्ससिंग अर्थात सामाजिक अंतराची  लक्ष्मण रेषा कधीही ओलांडायची नाही.

आरोग्य मंत्रालयाची COVID2019 घडामोडींवर पत्रकार परिषद 

देशातल्या कोरोना बाधितांची संख्या आता 2,301 झाली आहे. 56 जण मृत्यूमुखी पडले असून गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला. 157 कोरोनाबधित  यातून बरे झाले. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव श्री लव अगरवाल यांनी दिली.

श्री अगरवाल यांनी या परिषदेत खालील माहिती दिली.

  • तबलिजमात कार्यक्रमाशी संबंधित 14 राज्यातले  647 बाधित  गेल्या दोन दिवसात  आढळले आहेत. एका  विशिष्ट स्तरावर वाढ झाल्याने बाधितांच्या संख्येत वाढ झाली,सोशल डिस्टनसिंग अधिक  काटेकोरपणे, समावेशक रीतीने पाळणे आवश्यक
  • देखरेख, क्लिनिकल व्यवस्थापन, विलगिकरण, क्वारंटाईन, मानसिक आरोग्याची काळजी, लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन याबाबत, आरोग्य व्यावसायिकांच्या ऑन लाईन प्रशिक्षणासाठी आम्ही राज्यांना मार्गदर्शक सुचनावली जारी केली आहे.
  • अतिदक्षता विभाग आणि  व्हेंटीलेटर व्यवस्थापन याबाबत एम्स कडून प्रशिक्षण देण्यात येत आहे.
  • कोविड -19 चा संसर्ग होण्याचा धोका ओळखण्यासाठी नागरिकांना मदत व्हावी याकरिता केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे ऍप आणले आहे, कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क आल्यास हे ऍप आपल्याला नोटिफिकेशन देते.  
  • 30 लाख लोकांनी आरोग्य सेतू एप डाऊन लोड केले आहे. एका व्यक्तीची सुरक्षितता म्हणजे प्रत्येक व्यक्तीची सुरक्षितता आणि प्रत्येक व्यक्तीची सुरक्षितता  म्हणजे एका व्यक्तीची सुरक्षितता. म्हणूनच प्रत्येकाने हे ऍप डाऊनलोड करावे ही विनंती.
  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, सोशल डिस्टनसिंग राखण्यासाठी आणि स्वच्छता उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ई नाम पोर्टल सुरू केले आहे, 585 मंडया जोडल्या जाणार आहेत, बाजारात स्वतः उपस्थित न राहताही शेतकरी आपला कृषी माल विकू शकेल.
  • कोविड-19 च्या लढ्यात आघाडीवर असलेल्या आरोग्य व्यावसायिकांसाठी, डीआरडीओने  जैव पोशाख विकसित केला आहे,याबाबत चाचण्या सुरू आहेत, कोविड-19 विरोधातल्या आपल्या लढ्याला बळ देण्यासाठी, इतर संशोधन आणि विकास संस्थाही कार्यरत आहेत
  • आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या आपल्या आरोग्य व्यावसायिकांना, सर्व प्रकारे प्रोत्साहन देण्याचे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी सर्वाना केले आहे, या आरोग्य व्यवसायिकांच्या प्रयत्नामुळे 157 जण संसर्गातून बरे झाले.
  • अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे, पंतप्रधानांचे, सर्व नागरिकांना आवाहन, 5 एप्रिल 2020 ला रात्री 9 वाजता 9 मिनिटे दिवे उजळून, कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात राष्ट्राच्या ऐक्याचे दर्शन घडवण्याचे केले आवाहन.
  • कोविड-19 संदर्भातल्या तयारीबाबत, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी, राज्यांचे राज्यपाल आणि केंद्र शासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली, समाजाच्या दुर्बल घटकांविषयीची चिंता अधोरेखित केली, कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात नागरी समाजालाही सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.
  • आरोग्य व्यावसायिक आणि कोविड-19 विरोधातल्या लढ्यात आघाडीवर असलेल्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे राज्यांना निर्देश, वैद्यक विश्वातल्या लोकांच्या सुरक्षिततेची खातरजमा करण्याचेही निर्देश दिले.
  • गर्दी टाळण्यासाठी प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत लाभ गरजूंपर्यंत टप्प्याटप्प्याने पोहोचण्याची  खातरजमा करण्याचे गृह सचिवांचे राज्यांना आवाहन. बँक शाखात पुरेशी सुरक्षा आणि सोशल डिस्टनसिंग सुनिश्चित करण्याचे केले आवाहन.
  • भारतात पर्यटक व्हिसावर आलेल्या आणि तबलिजमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या 960 विदेशींचा काळ्या यादीत समावेश, तबलिजमात  कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या देशात परतलेल्या सुमारे 360 विदेशींचाही काळ्या यादीत समावेश करणार
  • केंद्रीय गृह मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या आतापर्यंत 7 हेल्पलाईन आहेत, 2 नव्या हेल्पलाईन आता सुरू झाल्या आहेत
  • 1930 हा अखिल भारतीय स्तरावरचा निःशुल्क दूरध्वनी मदत क्रमांक आहे,
  • 1944 हा ईशान्येकडील राज्यांसाठीचा मदत क्रमांक आहे
  • राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे हेल्पलाईन क्रमांक केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत
  • कोविड-19 चे निदान करण्यासाठी देशात,182 प्रयोगशाळा,130 शासकीय

प्रयोगशाळांचा यात समावेश, काल 8000 नमुने तपासण्यात आले असून, आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे, आतापर्यंत 66,000 नमुने तपासण्यात आले

  • आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि विदेशींसंदर्भातल्या कायद्याअंतर्गत, 960 विदेशींविरोधात कारवाई करण्यात येत आहे, या घडीला, हद्दपारीचा प्रश्नच उदभवत नाही, जेव्हा हद्दपार करायची असेल तेव्हा आदर्श आरोग्य नियमावलीनुसारच केली जाईल माध्यमांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर गृह मंत्रालयाचे उत्तर
  • कोविड-19 साठीच्या जलद निदान चाचण्यांच्या वापराबाबतची मार्गदर्शक तत्वे उद्यापर्यंत जारी  होतील अशी अपेक्षा आहे, हॉटस्पॉट आणि बिगर हॉटस्पॉट विभागात, अतिशय धोकादायक आणि कमी धोक्याच्या विभागात या चाचण्या कशा घ्यायच्या याबाबत चर्चा सुरू आहे.
  • निदान चाचण्या संच मर्यादित आहेत, अशा परिस्थितीत, केवळ आपल्या मनात शंका राहू नये या उद्देशाने चाचणी करणे व्यवहार्य नाही, हॉटस्पॉट विभागात आणि ज्या विभागातून मोठ्या संख्येने बाधित आढळले आहेत अशा ठिकाणच्या नमुन्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे, नमुना विषयक निकषांमध्ये  सुधारणा करण्याचा सध्यातरी कोणताही निर्णय नाही.

@PIBMumbai चे प्रेस कॉन्फरन्सचे लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा this thread.

Other updates:

 

***

 

DJM/RT/MC/PM



(Release ID: 1610793) Visitor Counter : 234