माहिती आणि प्रसारण मंत्रालय

“योग अभ्यास नव भारताचा मंत्र”: प्रकाश जावडेकर


आंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून माहिती आणि प्रसारण मंत्रालय देणार आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान

Posted On: 08 JUN 2019 2:42PM by PIB Mumbai

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, नियमित योगाभ्यास आणि प्रसारामुळे “निरोगी आयुष्य, निरोगी जीवनशैली, आरोग्य आणि रोग प्रतिकारक शक्ती” प्राप्त होते. ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव भारताचा मंत्र बनली आहे. योगाला संयुक्त राष्ट्राने सर्वमान्यता दिली असून दरवर्षी 21 जूनला जगभरातील 200 देशांमध्ये योगाभ्यास केला जातो.

भारत आणि परदेशात योगाचा प्रसार आणि प्रचारात प्रसारमाध्यमांची सकारात्मक भूमिका आणि जबाबदारीला स्विकारत जावडेकर यांनी सांगितले की, योगाच्या प्रचारात प्रसारमाध्यमांच्या योगदानाला सन्मानित करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान प्रदान करण्याचे ठरवले आहे. प्रसार माध्यमांना खालील श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येईल:

  • आंतरराष्ट्रीय योग दिवस मिडिया सन्मान प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक प्रसारमाध्यम संघटनांशी निगडीत संघटना( टेलिव्हिजन आणि रेडिओ)
  • तीन श्रेणींमध्ये 33 सन्मान
  • वर्तमानपत्रातील 22 भारतीय भाषा आणि  इंग्रजीमध्ये योगाच्या उत्कृष्ट वार्तांकनासाठी 11 सन्मान
  • टेलिव्हिजन वरील 22 भारतीय भाषा आणि  इंग्रजीमध्ये योगाच्या उत्कृष्ट वार्तांकनासाठी 11 सन्मान
  • रेडिओवर 22 भारतीय भाषा आणि  इंग्रजीमध्ये योगाच्या उत्कृष्ट वार्तांकनासाठी 11 सन्मान
  • या सन्मानामध्ये पदक/प्रशस्तीपत्र/मानचिन्ह देण्यात येईल
  • 10 जून ते 25 जून 2019 पर्यंत केलेले योग कार्यक्रमांचे वार्तांकन यासाठी ग्राह्य धरले जाईल.
  • योगला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या योगदानाचे परीक्षण 6 सदस्यीय परीक्षक मंडळ करेल.
  • आंतरराष्ट्रीय योग दिन सन्मान प्राप्त करणाऱ्या नावांची घोषणा केली जाईल तसेच जुलै 2019 मध्ये एका कार्यक्रमांतर्गत पुरस्कार वितरीत केले जातील.

या पत्रकार परिषदेवेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे, आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थितीत होते.

 

***

Dhananjay Wankhede/Sharmishtha


(Release ID: 1573848) Visitor Counter : 226