• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

देशातल्या माहिती तंत्रज्ञान सेवेचा संजय धोत्रे यांनी घेतला आढावा


75 दशलक्ष लोकांकडून आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड

Posted On: 24 APR 2020 9:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24  एप्रिल 2020

 

कोविड-19 लॉक डाऊन दरम्यान इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपक्रम आणि  विविध विभागांनी हाती घेतलेल्या उपक्रमांचा केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. हाती घेतलेल्या विविध उपायांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. सोशल डीस्टन्सिंगच्या सर्व निकषांचे पालन करत देशाच्या सेवेप्र्ती स्वतःला वाहून घेण्याचे आवाहन त्यांनी या विभागांना केले.

75 दशलक्ष लोकांनी याआधीच आरोग्य सेतू ॲप मोबाईल फोनवर डाऊन लोड केल्याची माहिती त्यांना देण्यात आली.जागतिक महामारीच्या या काळात हे ॲप म्हणजे कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातले एक  महत्वाचे साधन असल्याचे ते म्हणाले. हे ॲप जनतेपर्यंत पोहोचवून ते लोकप्रिय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.

माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान निगडीत सेवा क्षेत्र यावर त्यांचे लक्ष असून लॉक डाऊन नंतरच्या काळात हे क्षेत्र हळू-हळू सुरु करण्यासंदर्भात त्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांशी तपशीलवार चर्चा केली. या अभूतपूर्व परिस्थितीत जनतेसाठी उपयुक्त ठरतील अशा पद्धतीने माहिती तंत्रज्ञानआधारित उपाय आणि सेवा अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. देशाच्या प्रत्येक क्षेत्राचा कणा म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या महत्वाच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला.या कठीण परिस्थितीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार अथक प्रयत्न करत आहे.मानवतेची सेवा करण्यासाठी  मिळालेल्या या संधीचा उपयोग करत जनतेला  मदत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे त्यांनी सांगितले. 

सीएससीचे  देशभरात मोठे जाळे असून संकटाच्या या काळात देशात, विशेषकरून दुर्गम भागात टेली मेडिसिन पुरवण्यासाठी या सेवेचा उपयोग करता येईल. लॉक डाऊनच्या काळात वैद्यकीय सुविधा मिळवण्यात अडचण भासणाऱ्या लोकांना यामुळे मोठा दिलासा मिळेल असे  त्यांनी सांगितले.

G.Chippalkatti/N.Chitale/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1618022) Visitor Counter : 220


Link mygov.in