पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले

Posted On: 21 OCT 2026 6:38PM by PIB Mumbai

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत  पुरुषांच्या 'हाय जंप T64 प्रकारात एक शानदार उडी मारत, स्वतःचाच विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक  कायम राखणाऱ्या प्रवीण कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

प्रवीण कुमार याने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सातत्याने यशस्वी कामगिरी केल्याचे  नमूद करत, मोदी म्हणाले की, ही उल्लेखनीय  कामगिरी त्याचे  सातत्य , क्रीडा नैपुण्य आणि उत्कृष्टतेचा  अथक ध्यास दर्शवते. देशासाठी पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल मोदी यांनी प्रवीण याचे हार्दिक अभिनंदन केले.
'एक्स' वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने  म्हटले आहे:
"आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत प्रवीण कुमार याची यशाची मालिका जारी  आहे!
एका शानदार उडीसह, त्याने  पुरुषांच्या 'हाय जंप T64' प्रकारात स्वतःचा विक्रम मोडत सुवर्णपदक यशस्वीपणे कायम राखले आहे. ही असाधारण कामगिरी त्याचे  सातत्य, क्रीडा नैपुण्य आणि उत्कृष्टतेप्रति अथक ध्यास दर्शवते. देशासाठी पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल प्रवीण याचे हार्दिक अभिनंदन : पंतप्रधान @narendramodi"

 

***

Nilima Chitale / Sushma Kane / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326280) अभ्यागत कक्ष : 6