माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इफ्फी 2026 साठी माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणीला 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Posted On: 15 OCT 2026 5:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI 2026) माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणीची मुदत दोन दिवसांनी वाढवून ती 17 ऑक्टोबर  2026 केली आहे.

20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पणजी, गोवा इथे आयोजित होणाऱ्या या महोत्सवाचे वार्तांकन करण्यासाठी इच्छुक असलेले माध्यम प्रतिनिधी पत्र सूचना कार्यालयाच्या (PIB) अधिकृत अधिस्वीकृती पोर्टलद्वारे त्यांचे अर्ज सादर करू शकतात.

पात्र माध्यम प्रतिनिधींनी सुधारित अंतिम मुदतीपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे सुचवण्यात येत आहे.

नोंदणी लिंक: https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx

चौकशीसाठी, अर्जदार iffi.mediadesk@pib.gov.in येथे संपर्क साधू शकतात.

इफ्फीबद्दल

1952 मध्ये सुरू झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी हा दक्षिण आशियातील सर्वांत जुना आणि सर्वांत मोठा चित्रपट सोहळा आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील 'नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' (एनएफडीसी) आणि गोवा राज्य सरकारची 'एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा' (ईएसजी) यांच्या वतीने संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील चित्रपटकर्मी, आघाडीचे प्रथितयश कलाकार आणि उदयोन्मुख अभिव्यक्ती एकत्र येत असतात. गोव्याच्या उत्साही  वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मास्टरक्लास अर्थात दिग्गजांच्या कार्यशाळा आणि विशेष गौरव सत्रांच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कथा, भाषा आणि चित्रपट परंपरांचा गौरव केला जातो. 57व्या इफ्फी 2026 संदर्भातील अधिक माहिती आणि अद्ययावत तपशीलांसाठी  https://www.iffigoa.org/  या संकेतस्थळाला भेट द्या.

 

 

राधिका अघोर/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
 

 


(Release ID: 2323964) अभ्यागत कक्ष : 24