माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची 18 सदस्यांसह केली पुनर्रचना

Posted On: 16 SEP 2026 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026

केंद्र सरकारने तात्काळ प्रभावाने पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (CBFC - Central Board of Film Certification) पुनर्रचना केली आहे.

चित्रपट अधिनियम (Cinematograph Act) 1952 च्या कलम 3 च्या उप कलम (1) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, चित्रपट (प्रमाणन) नियम 2024 च्या नियम 3 च्या आधारे केंद्र सरकारने ही पुनर्रचना केली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे 16 सप्टेंबर 2026 रोजी मंडळाच्या या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पुनर्रचित केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळातील 18 सदस्यांची यादी खाली नमूद केली आहे:

अ. क्र.

सदस्याचे नाव

1

विनोद अनुपम

2

मनोज जोशी

3

अभिषेक जैन

4

रिकी केज

5

प्रियदर्शन

6

सुनील शेट्टी

7

हंसराज हंस

8

सुप्रिया यारलागड्डा

9

यतींद्र मिश्रा

10

रुपाली गांगुली

11

प्रिती झिंटा

12

नील माधव पंडा

13

पंकज त्रिपाठी

14

प्रसन्नजित चॅटर्जी

15

पल्लवी जोशी

16

निशिगंधा वाड

17

वामन केंद्रे

18

रमेश पतंगे

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे 16 सप्टेंबर 2026 रोजी मंडळाच्या या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2311111) अभ्यागत कक्ष : 10