माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रकाशन विभागाने 'FIP एक्सलन्स इन बुक प्रॉडक्शन अवॉर्ड्स 2026' मध्ये पटकावले 7 पुरस्कार
'FIP अवॉर्ड्स 2026’ मध्ये 'भारत 2026’ने पटकावले द्वितीय पारितोषिक तर 'धरती की सेहत'ने पटकावले तृतीय पारितोषिक
Posted On:
25 AUG 2026 4:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2026
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या 'प्रकाशन विभागाला' फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स' (FIP) च्या 'एक्सलन्स इन बुक प्रॉडक्शन अवॉर्ड्स 2026' मध्ये सात पुरस्कार मिळाले आहेत. विभागाची हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील नियतकालिके, पुस्तके आणि संदर्भ पुस्तकांना विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार मिळाले आहेत.
'प्रकाशन विभाग'चे महासंचालक डॉ. धीरज काकडिया यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त पुस्तके आणि नियतकालिकांच्या संपादकांना गौरवण्यात आले. तसेच या उल्लेखनीय कामगिरीशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी डॉ. धीरज काकडिया म्हणाले, "प्रकाशन विभागाला मिळालेले सात पुरस्कार हे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सामूहिक परिश्रम, समर्पित वृत्ती आणि उत्कृष्टतेचा दाखला आहे. हे पुरस्कार आम्हाला उच्च दर्जाचे,विश्वासार्ह आणि उपयुक्त आशय सामग्री प्रकाशित करण्यासाठी आणखी प्रेरित करतात. ज्ञान, साहित्य, संस्कृती आणि राष्ट्रीय विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण कल्पना आणि दृष्टिकोन मांडणारी उत्कृष्ट पुस्तके आणि नियतकालिके हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषांमधून वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशन विभाग कटिबद्ध आहे."

विभागाद्वारे प्रकाशित होणारी पुस्तके आणि नियतकालिके राष्ट्रीय विकास, ज्ञान आणि विज्ञान, साहित्य, संस्कृती, कला आणि समकालीन समस्यांशी संबंधित वैविध्यपूर्ण आणि मौल्यवान विचार वाचकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
या सात पुरस्कारांमध्ये चार द्वितीय पारितोषिके आणि तीन तृतीय पारितोषिकांचा समावेश आहे. हे यश प्रकाशन विभागाची प्रकाशनातील उत्कृष्टता, संपादकीय दर्जा आणि सामग्रीतील विविधता यांप्रति निरंतर वचनबद्धता दर्शवते.
द्वितीय पारितोषिके पटकावणारी प्रकाशने
- भारत 2026 (हिंदी) संदर्भ पुस्तक -हिंदी श्रेणीत पटकावले द्वितीय पारितोषिक
- 'विंग्स टू अवर होप्स - व्हॉल्युम 2' ला जनरल आणि ट्रेड बुक्स (इंग्रजी) श्रेणीत मिळाले द्वितीय पारितोषिक
- 'विकसित भारत@2047’ संकल्पनेवर आधारित योजना –जुलै 2026 (हिंदी) मासिकाला जर्नल आणि हाऊस मॅगझिन (हिंदी) श्रेणीत मिळाले द्वितीय पारितोषिक
- 1952 पासून प्रकाशित होत असलेल्या 'कुरुक्षेत्र' या ग्रामीण विकास मासिकाला जर्नल आणि हाऊस मॅगझिन - इंग्रजी या श्रेणीत द्वितीय पारितोषिक मिळाले.
तृतीय पुरस्कार प्राप्त प्रकाशने
- 'धरती की सेहत' या पुस्तकाला 'बालसाहित्य (सामान्य आवड) (0–10 वर्षे) - हिंदी' या श्रेणीत तृतीय पारितोषिक मिळाले.
- 'रंगोली रूप सुर लय की' या पुस्तकाला 'कला आणि कॉफी टेबल बुक्स - हिंदी' श्रेणीत तृतीय पारितोषिक मिळाले.
- 'आजकल' या उर्दू मासिकाच्या जुलै 2026 या अंकास 'नियतकालिके आणि हाऊस मॅगझिन्स, भारतीय भाषा (उर्दू)' या श्रेणीत तृतीय पारितोषिक मिळाले.
हे पुरस्कार विश्वासार्ह, माहितीपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आशय प्रकाशित व प्रसारित करण्यातील प्रकाशन विभागाची भूमिका अधिक बळकट करतात. या सन्मानामुळे, वाचकांसाठी उच्च दर्जाची पुस्तके, नियतकालिके आणि संदर्भ प्रकाशने उपलब्ध करून देण्याचे तसेच त्याद्वारे अस्सल व जनताभिमुख आशय सादर करण्याचे कार्य या विभागाद्वारे यापुढेही सुरू ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल.

'भारत 2026' (हिंदी) या पुस्तकाला 'संदर्भ ग्रंथ – हिंदी' श्रेणीत द्वितीय पारितोषिक मिळाले.

विंग्स टू अवर होप्स – व्हॉल्युम 2 या पुस्तकाला 'जनरल आणि ट्रेड बुक्स - इंग्रजी' श्रेणीत द्वितीय पारितोषिक मिळाले.

'योजना' च्या 'विकसित भारत @2047' या संकल्पनेवर आधारित हिंदी – जुलै 2026' अंकाला 'जर्नल आणि हाऊस मॅगझिन – हिंदी' या श्रेणीत द्वितीय पारितोषिक मिळाले.

1952 पासून प्रकाशित होत असलेल्या 'कुरुक्षेत्र ' या ग्रामीण विकास मासिकाला जर्नल आणि हाऊस मॅगझिन - इंग्रजी या श्रेणीत द्वितीय पारितोषिक मिळाले.

'धरती की सेहत' या पुस्तकाला 'बालसाहित्य (सामान्य आवड) (0–10 वर्षे) - हिंदी' या श्रेणीत तृतीय पारितोषिक मिळाले.

'रंगोली रूप सुर लय की' या पुस्तकाला 'कला आणि कॉफी टेबल बुक्स - हिंदी' श्रेणीत तृतीय पारितोषिक मिळाले.

'आजकल ' या उर्दू मासिकाच्या जुलै 2026 या अंकास 'नियतकालिके आणि हाऊस मॅगझिन्स, भारतीय भाषा (उर्दू)' या श्रेणीत तृतीय पारितोषिक मिळाले.
'फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स' (FIP) बद्दल थोडक्यात
'फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स' ही इंग्रजी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील प्रकाशकांची प्रातिनिधिक संस्था आहे. देशभरातील प्रकाशक याचे सदस्य असून, प्रकाशन क्षेत्रातील 80 टक्क्यांहून अधिक संस्थांचे प्रतिनिधित्व करते. देशातील सर्व प्रमुख प्रकाशक याचे प्रत्यक्ष सदस्य आहेत, तर इतर प्रकाशकांचे प्रतिनिधित्व विविध स्थानिक संघटनांमार्फत केले जाते.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303118)
अभ्यागत कक्ष : 12