शिक्षण मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाच्या शिक्षक दिनी , देशातील उच्च शिक्षण संस्था तसेच तंत्रनिकेतन संस्थांमधील 21 शिक्षक आणि प्राध्यापकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जाणार, महाराष्ट्रातील 3 शिक्षकांचा समावेश
प्रविष्टि तिथि:
24 AUG 2026 3:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 24 ऑगस्ट 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे देशातील उच्च शिक्षण संस्था तसेच शासकीय तंत्रनिकेतन संस्थांमधील 21 शिक्षक आणि प्राध्यापकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतील.
या पुरस्कारांसाठी यावर्षी, केंद्रीय उच्च शिक्षण संस्थामधील 12 शिक्षक आणि प्राध्यापक, तीन शासकीय आणि दोन खासगी महाविद्यालये यांच्यासह राज्य विद्यापीठांमधील 5 तर दोन शासकीय आणि दोन खासगी तंत्रनिकेतन संस्थांमधील 4 शिक्षक आणि प्राध्यापकांची निवड झाली आहे.
यंदा 26 मे ते 20 जुलै 2026 या कालावधीत @www.awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी नामांकने आमंत्रित करण्यात आली होती.
आदर्श शिक्षक तसेच प्राध्यापकांना हा पुरस्कार देण्यात येतो आणि अध्ययन-अध्यापन परिणामकारकता, प्रसारविषयक कार्ये, संशोधन आणि नवोन्मेष तसेच पुरस्कृत संशोधन/शिक्षक विकास कार्यक्रम आणि सल्लावजा अध्यापन यांच्यासह अनेक मापदंडांच्या आधारावर या शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून या पुरस्कारांसाठी त्यांची निवड करण्यात येते.
निवड प्रक्रियेमध्ये खालील दोन टप्प्यांच्या प्रक्रियेचा समावेश होतो:
(i) प्रारंभिक निवड करण्यासाठी प्राथमिक शोध आणि छाननी समितीद्वारे मूल्यांकन आणि
(ii) पहिल्या टप्प्यातील छाननी प्रक्रियेनंतर निवडलेल्या अर्जांतून परीक्षकांच्या समितीद्वारे पुरस्कार विजेत्यांची निवड
यावर्षीच्या पुरस्कारविजेत्या शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील 3 शिक्षक/प्राध्यापकांचा समावेश आहे-
1. प्रा.विक्रम विशाल - आयआयटी मुंबई
2. डॉ.अमर मोहनराव ताकसांडे- जवाहरलाल नेहरूवैद्यकीय महाविद्यालय (जेएनएमसी), वर्धा
3. डॉ.संदीपन प्रल्हाद नरोटे- शासकीय तंत्रनिकेतन संस्था , सोलापूर
***
सुषमा काणे/संजना चिटणीस/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2302807)
आगंतुक पटल : 26