पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
भारताच्या ब्रिक्स (BRICS) 2026 अध्यक्षतेखाली आयोजित ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या 12 व्या बैठकीत चार ज्ञान-संग्रहांचे प्रकाशन
प्रविष्टि तिथि:
18 AUG 2026 8:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2026
भारताच्या ब्रिक्स (BRICS) 2026 अध्यक्षतेखाली आयोजित ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या 12 व्या बैठकीत, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी ब्रिक्स सदस्य देशांच्या शिष्टमंडळ प्रमुखांच्या उपस्थितीत, 'ब्रिक्स पर्यावरण कार्यगटा'ने तयार केलेल्या चार ज्ञान-संग्रहांचे प्रकाशन केले. हे दस्तऐवज ब्रिक्स सदस्य देशांमधील सर्वोत्तम पद्धती, ज्ञान प्रणाली आणि नवोन्मेष प्रतिबिंबित करतात.
हे संग्रह 'ब्रिक्स' पर्यावरण कार्यगटात झालेल्या रचनात्मक आणि अर्थपूर्ण चर्चांचे फलित असून, या चर्चांमधून ज्ञानावर आधारित चार सहयोगात्मक उत्पादने विकसित करण्यात आली आहेत. एकत्रितपणे, ते सहकार्याच्या भावनेला मूर्त रूप देतात आणि ब्रिक्स सदस्य देशांचे राष्ट्रीय अनुभव, सर्वोत्तम पद्धती, नाविन्यपूर्ण उपाय आणि स्थानिक ज्ञान प्रणाली प्रतिबिंबित करतात.

1. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने भारताच्या 'ब्रिक्स 2026' अध्यक्षतेखाली संकलित केलेला 'शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याबाबत राष्ट्रीय अनुभव, सर्वोत्तम पद्धती आणि यशो गाथांवरील संग्रह', ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या ब्रिक्स सदस्य देशांमधील अनुकरणीय 'केस स्टडीज' एकत्रत आणणारा सामूहिक ज्ञान-भांडार म्हणून काम करतो. ब्रिक्स सदस्य देश धोरणात्मक नवकल्पना, वर्तणूक बदल उपक्रम, पर्यावरण शिक्षण, सामुदायिक सहभाग, शाश्वत उपभोग आणि उत्पादन, चक्राकार अर्थव्यवस्था दृष्टिकोन, परिसंस्थेचे पुनर्संचयन, स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि हरित विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून शाश्वत जीवनशैलीच्या संकल्पनेचे व्यावहारिक कृतीत रूपांतर कसे करत आहेत, हे या संकलनात नमूद केले आहे. भारताच्या योगदानामध्ये मिशन लाईफ (LiFE), पर्यावरण शिक्षण कार्यक्रम, संभव (SAMBHAV) मोहीम, याचा समावेश असून, तो नागरिकांच्या नेतृत्वाखालील शाश्वत जीवनशैलीसाठी संपूर्ण-सरकार आणि संपूर्ण-समाज दृष्टीकोन प्रतिबिंबित करतो. वैयक्तिक निवडी, बाजारपेठेतील पुरवठ्यात बदल आणि धोरणात्मक चौकट याचा एकत्रित परिणाम होऊन या प्रणालीत कशा प्रकारे परिवर्तन घडते, हे यामधून दिसून येते. अशा प्रकारे, नागरिकांचा सहभाग आणि मालकीहक्क, परिस्थितीनुसार उपाययोजना आणि डिजिटल एकत्रीकरण यावर भर देऊन, हा संग्रह पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना देण्यासाठी परस्पर अध्ययन, संयुक्त संशोधन आणि बहुपक्षीय सहकार्य यासाठी एक कृतीयोग्य चौकट प्रदान करतो.
2. एकात्मिक अग्निव्यवस्थापनासाठी सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचा संग्रह: जागतिक स्तरावर, बदलती हवामानाची परिस्थिती, दीर्घकाळ पडलेला दुष्काळ आणि वाढते तापमान यामुळे जंगलातील वणव्यांची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे. यामुळे परिसंस्था, जैवविविधता, उपजीविका आणि समुदाय धोक्यात येत आहेत. हे सामायिक आव्हान ओळखून, भारताने आपल्या ‘ब्रिक्स 2026’ अध्यक्षपदांतर्गत 'एकात्मिक वणवा व्यवस्थापन' या विषयाला आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या केंद्रस्थानी आणले. या प्रवासाने एकात्मिक वणवा व्यवस्थापनासाठी समुदायाच्या नेतृत्वाखालील प्रतिबंध आणि स्थानिक ज्ञानापासून ते पूर्वसूचना प्रणाली, तंत्रज्ञान, सज्जता आणि समन्वित प्रतिसाद, याबाबतचे अनुभव, नाविन्यपूर्ण उपाय आणि व्यावहारिक दृष्टिकोन याची देवाणघेवाण करण्यासाठी सदस्य देशांना एकत्र आणले. 'एकात्मिक वणवा व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन' यांवरील संग्रह, ही यामधील एक फलनिष्पत्ती आहे. विविध देशांमधील अनुभवांच्या संग्रहापलीकडे जाऊन, हा संग्रह एका सामायिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दर्शवतो, ते म्हणजे, प्रतिबंधापासून ते सज्जतेपर्यंत, पूर्वसूचनेपासून ते त्वरित कृतीपर्यंत आणि आपत्कालीन प्रतिसादापासून ते पूर्वस्थितीत येण्यापर्यंत, वणव्यांचे व्यवस्थापन आपण सर्वांनी एकत्र येऊन केले पाहिजे. ज्ञान, तंत्रज्ञान, संस्था आणि समुदाय यांना परस्परांशी जोडून, ब्रिक्स देश आपली सामूहिक लवचिकता मजबूत करू शकतात, तसेच वने आणि जैवविविधतेचे रक्षण, उपजीविकेची सुरक्षा आणि वणव्यांचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम भविष्य घडवू शकतात.
3. एकात्मिक भूदृश्य-आधारित हरितीकरण दृष्टिकोनावरील संकलन हे जमिनीचा ऱ्हास, वाळवंटीकरण, जैवविविधतेचा ऱ्हास आणि हवामान बदल यासारख्या परस्परसंबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांचे अनुभव, उत्तम पद्धती आणि धोरणात्मक दृष्टिकोन एकत्र आणते. ते सदस्य देशांच्या सामूहिक योगदानाचे प्रतिबिंब दर्शवते आणि परिसंस्था पुनर्संचयनासह जैवविविधता संवर्धनाचा मेळ घालणाऱ्या, भूदृश्य-आधारित उपाययोजनांवर प्रकाश टाकते. हा संग्रह अशा क्षेत्रांचीही ओळख करून देतो जिथे ब्रिक्स सहकार्य अधिक मजबूत केले जाऊ शकते. यामध्ये ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण, क्षमता बांधणी आणि तांत्रिक सहकार्य, संयुक्त संशोधन आणि देखरेख तसेच मूल्यमापनासाठी सामायिक दृष्टिकोन विकसित करणे याचा समावेश आहे. परस्पर सहकार्य दृढ करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे, तसेच परिसंस्था पुनर्संचयित करणे, हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता वाढवणे, उपजीविका सुधारणे आणि जागतिक पुनर्संचयन आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याच्या प्रयत्नांना दिशा देऊ शकणारी व्यावहारिक उदाहरणे यामधून अधोरेखित होतात.'विस्तारित उत्पादक जबाबदारी आराखडे आणि प्रमुख चक्रीय अर्थव्यवस्था पद्धतींवरील संकलन' हे, चक्रीय आणि संसाधन-कार्यक्षम अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या संक्रमणाला संबोधित करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांचे अनुभव, धोरणात्मक दृष्टिकोन, नियामक साधने आणि संस्थात्मक प्रारूपे एकत्र आणते.
4. 'विस्तारित उत्पादक जबाबदारी चौकट आणि प्रमुख चक्राकार अर्थव्यवस्था पद्धतींवरील संकलन' हे, चक्राकार आणि संसाधन-कार्यक्षम अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या संक्रमणाला संबोधित करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांचे अनुभव, धोरणात्मक दृष्टिकोन, नियामक साधने आणि संस्थात्मक प्रारूपे यांना एकत्र आणते. यामध्ये समुदायाच्या नेतृत्वाखालील कचरा व्यवस्थापन आणि डिजिटल कचरा-विनिमय मंचापासून ते राष्ट्रीय चक्राकार अर्थव्यवस्थेचे रोडमॅप, डिजिटल ट्रेसेबिलिटी सिस्टम, रीसायकलिंग सर्टिफिकेशन आणि कचरा-क्षेत्रातील सर्वसमावेशक सुधारणांपर्यंतच्या प्रमुख उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा संग्रह विविध प्रकारच्या कचऱ्याचा समावेश करणाऱ्या विस्तारित उत्पादक जबाबदारीच्या बाजार-आधारित रचनेकडे भारताची होणारी वाटचाल दर्शवतो, त्याला केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि विस्तारित चौकटींची जोड मिळाली आहे. तसेच, यामध्ये ब्रिक्स सहकार्य अधिक मजबूत करता येईल अशा प्रमुख क्षेत्रांची ओळख करून दिली आहे, यामध्ये ज्ञान आणि अनुभवाची देवाणघेवाण, डिजिटल ट्रेसिबिलिटी सोल्यूशन्स, तांत्रिक क्षमता बांधणी आणि संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर करणाऱ्या, लवचिक आणि शाश्वत अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी चक्राकार व्यवसाय मॉडेलचा विकास, याचा समावेश आहे.
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301008)
आगंतुक पटल : 11