पंतप्रधान कार्यालय
परिवर्तनाची 12 वर्षे : स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली भारताची प्रगती
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2026 1:18PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, गेल्या 12 वर्षात देशात झालेले परिवर्तन अधोरेखित करत, उत्पादन क्षेत्र, डिजिटल पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा, ऊर्जा सुरक्षा, युवा सक्षमीकरण, नवोन्मेष, सामाजिक सुरक्षा आणि इतर महत्वाच्या क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि प्रगती विशद केली.
पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे :
1. उत्पादन क्षेत्र: व्याप्ती आणि आत्मनिर्भरता
- गेल्या 12 वर्षात:
- संरक्षण उत्पादनात चौपट वाढ झाली आहे.
- खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात पाचपट वाढ झाली आहे.
- इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात, सातपट वाढ झाली आहे.
- आधुनिक रेल्वे डब्याच्या उत्पादनात 21 पट वाढ झाली आहे.
- मोबाईल फोन उत्पादनात 35 पट वाढ झाली आहे.
2. डिजिटल इंडिया आणि नवोन्मेष:
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भारताच्या डिजिटल आणि नवोन्मेष व्यवस्थेत अत्यंत गतिमानतेने झालेला विस्तार अधोरेखित केला.
- इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे.
- पेटंट मंजूर होण्याच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे.
- डिजिटल व्यवहारांमध्ये सुमारे 100 पट वाढ झाली आहे.
- भारताने डिजिटल आणि नवोन्मेषाची अधिक व्यापक व्यवस्था निर्माण केली आहे
3. पायाभूत सुविधा जलद गतीने नागरिकांपर्यंत पोहोचल्या
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ज्या गतीने पायाभूत सुविधा पोहोचल्या आहेत, त्यांची गती पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अधोरेखित केली:
- नळाद्वारे पाणीपुरवठ्याची जोडणी देण्याचा सरासरी वार्षिक वेग जवळपास 15 पटीने वाढला आहे.
- एलपीजी गॅस जोडण्या देण्याचा वार्षिक वेग जवळपास सहा पटीने वाढला आहे.
- गरीबांसाठी शौचालये बांधण्याचा वार्षिक वेग जवळपास चार पटीने वाढला आहे.
- गरीबांसाठी पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा वार्षिक वेग जवळपास तिपटीने वाढला आहे.
- शेकडो कालबाह्य कायदे रद्द करण्यात आले आहेत.
- मेट्रो प्रणालीसह आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अनेक शहरांमध्ये विस्तार झाला आहे.
4. सेमी कंडक्टर व्यवस्थेची उभारणी
सेमी कंडक्टर उत्पादनाच्या देशांतर्गत क्षमता वाढवण्यात झालेली प्रगती पंतप्रधानांनी अधोरेखित केली :
- यापूर्वी भारतात सेमीकंडक्टर निर्मितीचा कोणताही मोठा प्रकल्प नव्हता.
- आता भारतात संपूर्ण सेमीकंडक्टर परिसंस्था उभारली जात आहे.
- तीन सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.
- भारताने आता चिप्सची निर्यातही सुरू केली आहे.
5. महत्वाच्या खनिजांची उपलब्धता सुनिश्चित करणे:
उदयोन्मुख तंत्रज्ञानात महत्वाच्या खनिजांचे मोलाचे स्थान अधोरेखित करत पंतप्रधानांनी, या क्षेत्रात भारताच्या क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न भाषणातून सांगितले.
- महत्वाच्या खनिजासाठी राष्ट्रीय मोहिमेची सुरुवात.
- अर्थसंकल्पात क्रिटिकल मिनरल कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे.
- महत्वाच्या खनिजांच्या पुरवठ्यासाठी अनेक देशांसोबत करार करण्यात आले आहेत.
6. ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट करणे
विकसित भारत उभारण्यासाठी ऊर्जा सुरक्षा असणे अत्यंत महत्वाचे आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. विशेषतः चिप्स, एआय आणि डेटा सेंटर्स साठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज असते. त्याशिवाय, अणू ऊर्जेची महत्वाची भूमिका लक्षात घेत, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की:
- शांती कायदा (SHANTI Act) अणुऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण सुधारणा आहे.
- फास्ट ब्रीडर अणूऊर्जा तंत्रज्ञानात भारताने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
- अणु उर्जेच्या बाबतीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यात या तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची क्षमता आहे.
7. तेल आणि वायू उत्खननाच्या संधीचा विकास
पंतप्रधानांनी भारताच्या समुद्रातील उत्खनन आणि संशोधनाबाबतच्या दृष्टिकोनात झालेल्या बदलावर भाषणातून प्रकाश टाकला :
- यापूर्वी भारताच्या समुद्रातील जवळपास 99% क्षेत्राला ‘नो-गो एरिया’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते.
- आता हा दृष्टिकोन ‘नो-गो एरिया’कडून ‘गो अहेड एरिया’कडे बदलला आहे.
- पूर्वी उत्खननासाठी प्रतिबंधित असलेली क्षेत्रे आता खुली करण्यात आली आहेत.
- यामुळे नवीन तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे शोधण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
8. ऊर्जा वैविध्य
भारतात ऊर्जेच्या विविध स्रोतांच्या जलद विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
सिटी गॅस वितरण
- 2014: 70 पेक्षा कमी शहरांमध्ये उपलब्ध.
- आज: सुमारे 700 शहरांमध्ये उपलब्ध.
पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस
- 2014: सुमारे 20–22 लाख कुटुंबे.
- आज: जवळपास 1.75 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे.
सौर ऊर्जा
- 2014: सुमारे 2 गिगावॉट.
- आज: सुमारे 160 गिगावॉट.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना
- या योजनेचा लाभ 50 लाखांपेक्षा जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे.
- कमी किंवा शून्य वीज बिलामुळे लाखो कुटुंबांना लाभ होत आहे.
- कुटुंबे अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळवू शकतात.
- प्रत्येक कुटुंबाला सुमारे 80,000 पर्यंतची मदत उपलब्ध आहे.
9. रेल्वे: विद्युतीकरण आणि भविष्यातील इंधने
पंतप्रधानांनी भारतीय रेल्वेमध्ये झालेल्या परिवर्तनाचीही माहिती दिली:
- 2014 मध्ये: जवळपास 90 वर्षांनंतरही रेल्वेच्या केवळ सुमारे 30% मार्गांचे विद्युतीकरण झाले होते.
- आज: भारतीय रेल्वेने जवळपास संपूर्ण विद्युतीकरणाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
- भारताने आपल्या पहिल्या मेड इन इंडिया हायड्रोजन ट्रेनच्या निर्मितीचे काम सुरू केले आहे.
- ही ट्रेन जगातील सर्वात लांब आणि सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन म्हणून विकसित केली जात आहे.
10. जागतिक संकटांच्या काळात भारताचा कणखरपणा
पंतप्रधान म्हणाले की गेल्या 10-12 वर्षांत निर्माण केलेल्या सामर्थ्याची चाचणी खालील संकटांच्या वेळी झाली:
- कोविड-19 साथरोग.
- रशिया-युक्रेन युद्ध.
- पश्चिम आशियातील संघर्ष.
11. शेतकऱ्यांसाठी परवडणारी खते
शेतकऱ्यांचा खतांच्या आंतरराष्ट्रीय महागाईपासून बचाव करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले:
- युरिया (Urea): आंतरराष्ट्रीय बाजारात एका पोत्याची किंमत जवळपास ₹3,000 आहे; परंतु भारतातील शेतकऱ्यांना ते ₹300 पेक्षा कमी दरात मिळते.
- डीएपी (DAP): आंतरराष्ट्रीय बाजारात एका पोत्याची किंमत ₹5,000 पेक्षा जास्त आहे; परंतु भारतातील शेतकऱ्यांना ते ₹1,350 मध्ये मिळते.
12. व्यापार आणि निर्यातीच्या संधी
भारतीय उत्पादकांसाठी आणि निर्यातदारांसाठी निर्माण होत असलेल्या नवीन संधींवर पंतप्रधानांनी भर दिला:
- 2014 पासून भारताने जवळपास 40 देशांसोबत मुक्त व्यापार करार (FTAs) केले आहेत.
- शेती, मत्स्यव्यवसाय, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs), वस्त्रोद्योग आणि इतर निर्यात क्षेत्रांसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.
13. विकसित भारताच्या केंद्रस्थानी युवाशक्ती
भारताच्या उभारणीत देशातील तरुणांची मोठी भूमिका असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी निर्माण झालेल्या नवीन संधींवर भर दिला:
- स्टार्टअप इंडिया : नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी नवीन दालने.
- ₹1 लाख कोटींचा संशोधन निधी : तरुण संशोधकांसाठी नवीन संधी.
- डिजिटल इंडिया : परवडणाऱ्या डेटाच्या माध्यमातून सक्षमीकरण.
- स्किल इंडिया : राष्ट्रीय कौशल्य परिसंस्था .
- अंतराळ क्षेत्र : खाजगी सहभागासाठी खुले.
- राष्ट्रीय ड्रोन धोरण: तरुण उद्योजक आणि नवोन्मेषकर्त्यांसाठी नवीन संधी.
- खेलो इंडिया: मजबूत झालेली क्रीडा परिसंस्था.
14. शिक्षण आणि नवोन्मेष
शिक्षण आणि नवोन्मेषाच्या संधींचा विस्तार अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले:
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020: 35 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर लागू करण्यात आले.
- विद्यापीठे: 2004 ते 2014 दरम्यान 350 पेक्षा कमी विद्यापीठे होती; पुढील दशकात सुमारे 650 नवीन विद्यापीठांची भर पडली.
- वैद्यकीय महाविद्यालये: 2014 पूर्वी 400 पेक्षा कमी होती; आज ती सुमारे 850 झाली आहेत.
- शाळांमध्ये 10,000 पेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब्ज स्थापन करण्यात आल्या आहेत.
- लहान वयापासूनच तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची मानसिकता विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.
15. स्टार्टअप्स, अंतराळ आणि एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)
भारतातील वाढत्या स्टार्टअप आणि नवोन्मेष परिसंस्थेवर पंतप्रधानांनी भर दिला:
- एका भारतीय अंतराळ स्टार्टअपने 'मेड-इन-इंडिया' रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे.
- भारतामध्ये आता सुमारे 2.5 लाख नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत.
- एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तरुण भारतीयांसाठी नवीन संधी निर्माण करत आहे.
- भारताने या वर्षी 'एआय इम्पॅक्ट समिट'चे आयोजन केले.
16. नवीन क्षेत्रे आणि नवीन संधी
जैव अर्थव्यवस्था
- 2014: सुमारे ₹60,000 कोटी.
- आज: जवळपास ₹20 लाख कोटी.
- या विस्तारामुळे नवीन रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होत आहेत.
इलेक्ट्रिक वाहने (EVs)
- मागील दशकाच्या शेवटी: वर्षाला सुमारे 1.5 लाख EV ची विक्री.
- गेल्या वर्षी: सुमारे 25 लाख EV ची विक्री.
हवाई वाहतूक
- नवीन विमानतळ आणि हवाई मार्ग रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहेत.
- एमआरओ ( देखभाल, दुरुस्ती आणि संपूर्ण डागडुजी सेवा) नवीन संधी खुला करत आहे.
- भारत 'मेड-इन-इंडिया' विमान उत्पादनाच्या दिशेने पुढे जात आहे.
- भारतनिर्मित 'C-295' संरक्षण वाहतूक विमानाने यशस्वी उड्डाण पूर्ण केले आहे.
17. 'स्वामित्व' योजनेच्या माध्यमातून ग्रामीण सक्षमीकरण
'स्वामित्व' (SVAMITVA) उपक्रमाच्या प्रभावावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले:
- सुमारे 3.25 कोटी कुटुंबांना प्रॉपर्टी कार्ड्स मिळाली आहेत.
- ग्रामीण भागात सुमारे ₹140 लाख कोटींची आर्थिक क्षमता खुली झाली आहे.
- मालमत्तेच्या अधिकृत नोंदींमुळे ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेवर बँक कर्जे मिळणे शक्य होत आहे.
- ग्रामीण भागातील रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत.
18. संरक्षण निर्यातीतील वाढ
भारताच्या संरक्षण निर्यातीतील विस्तारावर पंतप्रधानांनी भर दिला:
- संरक्षण निर्यातीत 50 पटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
- भारतीय संरक्षण सामग्री आता सुमारे 100 देशांमध्ये निर्यात केली जाते.
19. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास: लखपती दीदी
भारताच्या विकासात महिलांच्या वाढत्या भूमिकेवर भर देताना:
- 3 कोटी 'लखपती दीदी' बनवण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.
- सामान्य, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी कुटुंबांतील महिला 'लखपती दीदी' बनल्या आहेत.
20. सामाजिक सुरक्षेचा विस्तार
सामाजिक सुरक्षा कवचाच्या विस्तारावर भर देताना पंतप्रधान म्हणाले:
- 2014 पूर्वी, सुमारे 25 कोटी लोक सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत होते.
- आज, सुमारे 100 कोटी भारतीय कोणत्या ना कोणत्या सामाजिक सुरक्षा योजनेशी जोडले गेले आहेत.
21. आयुष्मान भारत
आयुष्मान भारत योजनेद्वारे कुटुंबांना मिळालेल्या आर्थिक दिलाशावर पंतप्रधानांनी भर दिला:
- लाभार्थी कुटुंबांचे अंदाजे ₹2 लाख कोटींचे वैद्यकीय खर्च टळले आहेत.
***
माधुरी पांगे/राधिका अघोर/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2299930)
आगंतुक पटल : 8