उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

'वंदे मातरम्’ला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या खासदारांच्या बाईक रॅलीला, उपराष्ट्रपतींनी हिरवा झेंडा दाखवला


‘हर घर तिरंगा’ ही आता लोकचळवळ बनली असून, ती ‘वंदे मातरम्’च्या चैतन्यमय भावनांना मूर्तिमंत स्वरूप देते – उपराष्ट्रपती

'वंदे मातरम्'ने मातृभूमीवरील प्रेमाचे रूपांतर राष्ट्रीय कर्तव्यात केले: उपराष्ट्रपती

प्रविष्टि तिथि: 12 AUG 2026 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2026

 

'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताच्या 150 व्या वर्षापूर्तीनिमित्त आयोजित 'हर घर तिरंगा' बाईक रॅलीला, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

राष्ट्राभिमान, एकता आणि नागरिकांच्या सहभागाचा संदेश देत, ही फेरी भारत मंडपम पासून मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम पर्यन्त काढण्यात आली.

'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताने मातृभूमीच्या प्रेमाचे रूपांतर  राष्ट्रीय कर्तव्यात केले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या भावनांचे ते सशक्त आविष्करण बनले असे उपराष्ट्रपती उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. या गीताच्या  अजरामर बोलांनी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या हृदयात धैर्य, त्याग आणि आशा यांचे स्फुल्लिंग चेतवल्याचे त्यांनी स्मरण करून दिले.

उपराष्ट्रपतींनी नुकतीच अंदमान आणि निकोबार बेटांना भेट दिली. त्या भेटीची आठवण सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले की, “नेताजी सुभाषचंद्र बोस बेट आणि ऐतिहासिक सेल्युलर जेलला दिलेली भेट अत्यंत हृदयस्पर्शी होती. 1943 मध्ये नेताजींनी फडकवलेला तिरंगा आणि सेल्युलर जेलमध्ये बंदी असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान याबरोबरच, त्यातील अनेकांनी 'वंदे मातरम'चा जयघोष करत फासावर जाणे स्वीकारले होते याचे स्मरण केले.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात 'वंदे मातरम्' गीताचा झालेला  देशव्यापी प्रभाव सांगताना उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी तमिळनाडूतील स्वातंत्र्यसैनिक आणि नेत्यांच्या योगदानाचा आणि यांच्या बलिदानाचा आवर्जून उल्लेख केला. यात, व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई, सुब्रमण्य शिवा, तिरुप्पुर कुमारन आणि वांचीनाथन या स्वातंत्र्यसैनिकांचा याबरोबरच, राष्ट्रीय कवि सुब्रमण्यम भारती यांचा मोठा सहभाग होता. या सगळ्यांनी वंदे मातरम्'ची भावना आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचवले असं उपराष्ट्रपती म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये सुरू केलेली 'हर घर तिरंगा' मोहीम आता एका लोकचळवळीचे रूप धारण करत आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले.  यात नागरिक तिरंगा यात्रा, दुचाकी आणि सायकल फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून सहभागी होत आहेत. तिरंगा हा एकाच मातृभूमीच्या भावनेला दृश्य स्वरूप देतो, असे नमूद करून, आपापल्या मतदारसंघांत या मोहिमेचा प्रसार करण्याचे आणि नागरिकांना अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी खासदार आणि लोकप्रतिनिधींना आवाहन केले.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राजीव रंजन सिंह, वीरेंद्र कुमार, जी. किशन रेड्डी, किरेन रिजिजू आणि जितेंद्र सिंह यांच्यासह संसदेतील अन्य सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी या दुचाकी फेरीत सहभागी झाले होते. 

 

* * *

नेहा कुलकर्णी/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2298364) आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam