पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक हत्ती दिन 2026 च्या निमित्ताने भारताचा हत्ती संवर्धनाप्रति वचनबद्धतेचा पुनरुच्चार


हत्तींचे भविष्य सुरक्षित करणे म्हणजे आपल्या जंगलांचे, जैवविविधतेचे आणि पर्यावरणीय वारशाचे संरक्षण करणे होय: भूपेंद्र यादव

प्रविष्टि तिथि: 12 AUG 2026 11:19AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2026

 

जागतिक हत्ती दिन 2026 निमित्त केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री  भूपेंद्र यादव यांनी हत्ती आणि मानव यांच्या सहअस्तित्वाचे सामायिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.  भारतामध्ये 14 राज्यांमध्ये 33 हत्ती अभयारण्ये आणि 150 शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित हत्ती मार्गिका आहेत, असे वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमांवरील एका पोस्टमध्ये नमूद केले.   हत्तींच्या संख्येवर अत्याधुनिक पद्धतीने देखरेख ठेवणे आणि मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठीच्या अधिक प्रभावी उपायांमुळे हत्ती संवर्धनाला बळ मिळत आहे, असे यादव म्हणाले.  

वनमंत्र्यांनी पुढे सांगितले की, "जेव्हा आपण हत्तींचे भविष्य सुरक्षित करतो, तेव्हा आपण आपली जंगले, जैवविविधता आणि नैसर्गिक परिसंस्थेचा वारसा सुरक्षित करतो." येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी हत्ती भारताच्या जंगलांमध्ये आणि निसर्गरम्य भूभागांमध्ये मोकळेपणाने वावरत राहतील याची खातरजमा करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री  कीर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले की, भारत हा पृथ्वीवरील सर्वाधिक समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. जगातील सुमारे 60 टक्के वन्य आशियाई हत्ती भारतात आढळतात, त्यामुळे ते देशाच्या पर्यावरणीय वारशाचे जिवंत प्रतीक आहेत, असे  सिंह यांनी सांगितले. मंत्र्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील हत्ती अभयारण्ये ही देशाच्या संवर्धनाप्रति असलेल्या बांधिलकीची साक्ष देतात, असेही मंत्र्यांनी नमूद केले.

कीर्ती वर्धन सिंह यांनी परिसंस्थेचे शिल्पकार  म्हणून हत्तींच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही प्रकाश टाकला. हत्तींचा संचार सुरू असताना ते लांब अंतरापर्यंत बियाण्यांचा प्रसार करतात, ज्यामुळे नवीन वनस्पतींची निर्मिती होते. हत्तीचे प्रत्येक पाऊल निसर्गाचा समतोल राखण्यास हातभार लावते, असे  सिंह यांनी सांगितले. या महाकाय परंतु शांत प्राण्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

* * *

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2298211) आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , Kannada , Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam