पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभाला 8 ऑगस्ट रोजी करणार संबोधित


पंतप्रधान गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे सर्वोच्च सन्मान करणार प्रदान

पंतप्रधान आयआयटी दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये स्थापित 'परम प्रज्ञा' या एआय-सक्षम उच्च क्षमतेच्या सुपरकम्प्युटिंग सुविधेचे करणार उदघाटन

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2026 9:35AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ते 587 पीएच.डी संशोधकांसह  3000 हून अधिक पदवीधरांना संबोधित करणार आहेत. या सर्वांना कार्यक्रमात पदवी प्रदान केली जाईल. 

शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, पंतप्रधान गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे अत्यंत प्रतिष्ठिचे सन्मान  प्रदान करतील.  यामध्ये 'प्रेसिडंट्स गोल्ड मेडल'(राष्ट्रपती सुवर्णपदक), 'डायरेक्टर्स गोल्ड मेडल'(संचालक सुवर्णपदक), 'शंकर दयाळ शर्मा गोल्ड मेडल' (शंकर दयाळ शर्मा सुवर्ण पदक) आणि 'परफेक्ट टेन सुवर्णपदके' यांचा समावेश आहे.

अत्याधुनिक संशोधन आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला  चालना देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर  भर देत, पंतप्रधान आयआयटी  दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये स्थापित 'परम प्रज्ञा' या एआय-सक्षम  उच्च-क्षमतेच्या सुपरकम्प्युटिंग सुविधेचे उद्घाटन करतील. ही अत्याधुनिक सुविधा एआय, डेटा सायन्स, प्रगत संगणन आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या क्षेत्रातील संस्थेची क्षमता लक्षणीयरीत्या वृद्धिंगत करेल, अशी अपेक्षा आहे.

***

NehaKulkarni / SonaliKakade / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2295877) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam