पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारोत्तोलक बिंद्याराणी देवी सोरोखाईबम हिचे अभिनंदन केले
Posted On:
28 JUL 2026 7:50AM by PIB Mumbai
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारोत्तोलक बिंद्याराणी देवी सोरोखाईबम हिने महिलांच्या 58 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, तिचे यश हे तिच्या कठोर परिश्रमांचे आणि दृढनिश्चयाचे फलित आहे.
पंतप्रधानांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
“भारताचे भारत्तोलनातील आणखी एक पदक! ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 58 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल बिंद्याराणी देवी सोरोखाईबम हिचा अभिमान वाटतो. तिचे हे यश तिच्या कठोर परिश्रमांचे आणि दृढनिश्चयाचे फळ आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
#CWG2026”
***
NehaKulkarni / RajashreeAgashe / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2290276)
अभ्यागत कक्ष : 46
Read this releasein:
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati