पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ऊर्जा सुरक्षेसबंधी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संयुक्त निवेदन

प्रविष्टि तिथि: 09 JUL 2026 9:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,9 जुलै 2026

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे परस्परांचे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदार असून, एका मुक्त, खुल्या आणि समृद्ध भारत - प्रशांत क्षेत्रासाठी दोन्ही देशांचा दृष्टिकोन परस्पर समान आहे.

मध्यपूर्वेतील सद्यस्थिती आणि त्याचे आपल्या प्रदेशावर ऊर्जा, संसाधने आणि इतर महत्त्वाच्या वस्तुमालाच्या पुरवठा साखळी तसेच किमतींच्या बाबतीत प्रदीर्घ काळासाठी पडलेल्या प्रभावासह, सर्व परिणामांच्या बाबतीत भारत आणि ऑस्ट्रेलियाला तीव्र चिंता वाटते. अडथळे असलेल्या या परिस्थितीतही, आम्ही खुली आणि मुक्त बाजारपेठ तसेच नियमनावर आधारित व्यापाराप्रती असलेली आमची परस्पर सामायिक वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करतो, हीच तत्वे आपली समृद्धी आणि आर्थिक सुरक्षेचा पाया आहेत. 

शाश्वत आणि विश्वासार्ह ऊर्जेचा ओघ राखण्यासाठी खाजगी क्षेत्रासोबतची विश्वासार्ह भागीदारी आणि धोरणात्मक गुंतवणुकीची मध्यवर्ती भूमिकेची भारत आणि ऑस्ट्रेलिया जाणीव आहे. यालाच समांतरतपणे, आणि खाजगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागाला बळ देण्यासाठी, दोन्ही देश आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराच्या (ECTA) माध्यमातून, तसेच प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारासाठी (CECA) सुरू असलेल्या कार्यवाहीच्या आणि इतर संबंधीत द्विपक्षीय व्यवस्थेच्या आधारे द्विपक्षीय ऊर्जा व्यापार आणि गुंतवणूक सहकार्याला पुढची दिशा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आहेत. यासोबतच ऊर्जा क्षेत्रातील क्षमता बांधणी आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीच्या महत्त्व दोन्ही देश जाणून असल्याचेही आम्ही अधोरेखित करतो. 

ऑस्ट्रेलिया हा भारताला द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनाचा (LNG) पुरवठा करणारा एक महत्त्वाचा देश आहे आणि भारत हा ऑस्ट्रेलियाला द्रवरूप इंधनांचा तसेच त्यावर प्रक्रिया करून तयार केलेली इतर उत्पादनांचा (डाऊनस्ट्रिम प्रोडक्ट) पुरवठा करणारा एक महत्त्वाचा देश आहे, याची दखल घेत, भारत आणि ऑस्ट्रेलिया ऊर्जा उत्पादनांचा सातत्यपूर्ण पुरवठ्याचा ओघ कायम ठेवण्याकरता पाठबळ देण्याप्रति तसेच परस्परांमधील ऊर्जा व्यापाराचा अधिक विस्तार करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त करत आहेत. ऊर्जा क्षेत्राशी संबंधीत संपूर्ण मूल्य साखळीमध्ये गुंतवणुकीच्या संधींना चालना देण्याचे महत्त्वही भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा अधोरेखित करत आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील अणुऊर्जा सहकार्य करारांतर्गत (2015) नमूद तरतुदींनुसार, केवळ शांततापूर्ण उद्देशांसाठी आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) सुरक्षा मानकांचे पालन करून ऑस्ट्रेलियातील युरेनियमची भारताला सुलभतेने निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही देशांनी अंतिम रूप दिले आहे.

प्रादेशिक पातळीवरील सहकार्य अधिक दृढ करणे, ऊर्जा संक्रमण प्रक्रियेचा वेग वाढवणे, नवीकरणीय ऊर्जा स्रोतांच्या वापराला चालना देणे आणि ऊर्जा तसेच द्रवरूप इंधनांसाठी खुल्या व्यापार व्यवस्थेला पाठबळ पुरवणे यांसारख्या उपाययोजनांच्या माध्यमांतून ऊर्जा पुरवठा साखळीच्या लवचिकतेला बळकटी देण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध आहेत. संबंधीत ऊर्जा व्यवस्थेच्या विद्युतीकरणाचा विस्तार हा भविष्यातील ऊर्जा सुरक्षेचा एक महत्त्वाचा स्त्रोत ठरणार असल्याची जाणीवही दोन्ही देशांना आहे.

ऊर्जा क्षेत्रातील लवचिक व्यापार आणि बाजारपेठेसाठीची आपली परस्पर सामायिक वचनबद्धता ही संपूर्ण प्रदेशासाठी लागू असल्याची जाणीवही भारत आणि ऑस्ट्रेलियाला आहे. प्रंशात महासागरा अंतर्गतच्या बेट देशांच्या बाबतीत ऊर्जा संसाधनांच्या सुरक्षेसंदर्भातील विशिष्ट स्वरुपाचे संवेदनशील मुद्दे आणि या देशांची लवचिकता आर्थिक समृद्धीसाठी ऊर्जा संसाधनांच्या पुरवठ्याचे महत्त्व या बाबींची दखलही दोन्ही देशांनी घेतली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया, कोळसा, डिझेल, इतर द्रवरूप इंधने आणि नैसर्गिक वायू इंधन यांसारख्या ऊर्जा उत्पादनांचा स्थिर, सुरक्षित आणि विश्वासार्ह पुरवठा राखण्यासह ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी एकत्र काम करण्याबद्दलची आपली वचनबद्धताही पुन्हा एकदा व्यक्त करत आहेत. याचबरोबरीने, दोन्ही देश ऊर्जा संक्रमण प्रक्रियेला गती देण्याबद्दल तसेच कार्बनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या इंधनाबद्दलचे सहकार्य अधिक दृढ करण्याची आपली वचनबद्धताही पुन्हा एकदा व्यक्त करत आहेत. याच अनुषंगाने, जागतिक जैवइंधन आघाडी (GBA - Global Biofuels Alliance) या भारताने सुरू केलेल्या उपक्रमाची ऑस्ट्रेलियाने दखलपूर्ण नोंद घेतली आहे.

आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि समृद्धीसाठी जागतिक ऊर्जा संसाधनांची पुरवठा साखळी खुली राहील याची सुनिश्चिती करण्याकरता या प्रदेशातील इतर भागीदार देशांनी एकत्र यावे असे आवाहन भारत आणि ऑस्ट्रेलिया करत आहेत.

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2283096) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam