पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाच्या अध्यक्षांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया या इंडोनेशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने करण्यात आले सन्मानित
Posted On:
07 JUL 2026 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 जुलै 2026
इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या हस्ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिंतांग अदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया (Bintang Adipurna of the Republic of Indonesia) या सन्मान पदकाने सन्मानित करण्यात आले . हा पुरस्कार इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल तसेच त्यांच्या नेतृत्वासाठी इंडोनेशियाच्या या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांचा गौरव केला गेला. पंतप्रधानांनी हा पुरस्कार भारत आणि इंडोनेशियातील जनतेला, तसेच दोन्ही देशांमधील प्रदीर्घ काळापासूनच्या नागरी सांस्कृतिक संबंधांना समर्पित केला आहे.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2282062)
अभ्यागत कक्ष : 131
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam