अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अपीलीय न्यायाधिकरणाकडे अपील सादर करण्याची मुदत 31 जुलै 2026 पर्यंत वाढवली

प्रविष्टि तिथि: 30 JUN 2026 2:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2026

 

केंद्र सरकारने संबंधित कायद्याच्या कलम 112 (1) तसेच कलम 112 (3) मधील तरतुदीअंतर्गत, वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाकडे (जीएसटीएटी) अपील सादर करण्याच्या मुदतीत 31.07.2026 पर्यंत वाढ केली.

यापूर्वी, 17.09.2025 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने जीएसटीएटीकडे अपील करण्यासाठी 30.06.2026 पर्यंतची मुदत अधिसूचित केली होती.

विविध भागधारकांनी सादर केलेल्या जीएसटीएटी पोर्टलवर अपील करण्यासाठीच्या घाईमुळे उद्भवलेल्या अनेक तांत्रिक अडचणी लक्षात आणून देणाऱ्या निवेदनांचा विचार करून केंद्र सरकारने सदर अंतिम मुदतीत वाढ केली आहे. संबंधित कालमर्यादेविषयी खूप आधीच, सप्टेंबर 2025 मध्येच, अधिसूचित केले असूनही, गेल्या 15 दिवसांमध्ये, दर दिवशी 5,500 अपिलांच्या सरासरीसह 30,000 अपिले सादर करण्यात आली.

करदात्यांनी अपील सादर करण्याचे नियोजन वेळेआधीच करून ठेवावे आणि अंतिम मुदतीची वाट पाहू नये असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2279339) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam