संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 28 जुलै 2025 रोजी संसदेत केलेल्या भाषणाचा विपर्यास झाल्यासंदर्भातले निवेदन

प्रविष्टि तिथि: 27 JUN 2026 6:00PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत 28 जुलै 2025 रोजी केलेल्या भाषणाचा विपर्यास करणारी काही वृत्ते समाज माध्यमांवर फिरत आहेत. समाजमाध्यमांवरील या पोस्टमध्ये, संरक्षणमंत्र्यांच्या भाषणातील काही अंश, उद्धृत केले असून, ज्यातून असा चुकीचा अर्थ ध्वनित होतो, की संरक्षण मंत्र्यांनी, भाषणात असा  दावा केला होता, की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान एकाही भारतीय जवानाला आपले प्राण गमवावे लागेल नाहीत” हे दावे, जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे आणि सत्याचा अपलाप करणारे आहेत.

ज्यांनी संरक्षण मंत्र्यांच्या संसदेतील भाषणाला वादग्रस्त ठरवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी, मुद्दाम, जाणीवपूर्वक त्यांच्या भाषणाच्या संपूर्ण संदर्भाकडे दुर्लक्ष केले आहे.संरक्षण मंत्र्यांच्या भाषणादरम्यानही, माध्यमातील आणि समाज माध्यमातील काही विशिष्ट घटकांनी चुकीचे विमर्ष पसरवण्याचा जोरकस आणि सातत्याने प्रयत्न केला होता. या वृत्तामध्ये असा दावा करण्यात आला होतं, की ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय वैमानिकांना वीरगती प्राप्त झाली होते. हा विमर्ष देखील पूर्णपणे चुकीचा असून, तो जाणीवपूर्वक अत्यंत आक्रमकतेने पसरवण्यात आला होता. त्या मागचा स्पष्ट हेतू, ऑपरेशन सिंदूर चे यश नाकारणे आणि जनतेचे मनोधैर्य खच्ची करणे हाच होता. या विशिष्ट आणि दुर्हेतूने परसवलेल्या बातम्यांचा हेतू, संरक्षण मंत्र्यांच्या निवेदनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हाच होता. आणि म्हणूनच, त्यांच्या निवेदनाला लक्ष्य केले गेले आणि केवळ अर्धवट, संदर्भ तोडून, केलेला हा अपप्रचार, आज अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे.

संरक्षण मंत्र्यांचे भाषण त्याच्या संपूर्ण आणि योग्य संदर्भात लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे. संसदेतील त्यांचे निवेदन, संपूर्णपणे पाहता, 'ऑपरेशन सिंदूर'च्या उल्लेखनीय यशाचा एक अभिमानास्पद आणि अचूक वृत्तांत होता; हे एक असे ऑपरेशन होते, ज्यामध्ये भारतीय संरक्षण दलांनी अतुलनीय अचूकता, दृढनिश्चय आणि लष्करी व्यावसायिकतेचे प्रदर्शन केले. या ऑपरेशनदरम्यान 100 हून अधिक दहशतवादी आणि पाकिस्तानी सैनिकांना निष्प्रभ करण्यात आले, तसेच नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी हवाई तळ आणि सैन्य तुकडीच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर आणि लक्षणीय नुकसान झाले. हे भाषण भारतीय संरक्षण दलांच्या शौर्याला आणि क्षमतेला दिलेली एक समर्पक मानवंदना होती तसेच भारताचे नुकसान करू इच्छिणाऱ्यांसाठी एक स्पष्ट संदेश होता. 

संरक्षण मंत्री आणि भारत सरकार हे भारतीय संरक्षण दलाच्या प्रत्येक जवानाप्रति आणि विशेषतः राष्ट्राच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्यांप्रति आदर, कृतज्ञता आणि सन्मानाचा भाव कायमस्वरूपी बाळगून आहेत. त्यांचे बलिदान ही मातृभूमीची सर्वोच्च सेवा आहे आणि त्याचा योग्य तो गौरव नेहमीच प्रतिष्ठेने, अभिमानाने आणि गांभीर्याने केला जाईल.

त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा गौरव म्हणून सरकारने त्यांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या भिंतींवर कोरली जातील, याची खात्री केली आहे. सरकारने शूरवीरांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधांमध्ये सवलती देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

***

शैलेश पाटील/राधिका अघोर/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2278462) आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , English , Urdu , हिन्दी , Tamil , Malayalam