पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कतारच्या अमीरांसोबत दूरध्वनीवरून संभाषण
कतारमधील एका अपघातात काही भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कतारच्या अमीरांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधानांनी धन्यवाद देत जखमींना तातडीने वैद्यकीय मदत दिल्याबद्दल मानले आभार
दोन्ही नेत्यांनी आपल्या नागरिकांचे कल्याण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या कतारच्या सकारात्मक योगदानाबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
प्रविष्टि तिथि:
23 JUN 2026 10:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतार राष्ट्राचे अमीर, महामहिम शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले.
21 जून रोजी कतारमधील रास लाफान या औद्योगिक शहरात झालेल्या अपघातात, प्राण गमावलेल्या भारतीय नागरिकांबद्दल, कतारच्या अमीरांच्या मंत्रालयाने शोक व्यक्त केला आणि जखमी झालेल्यांच्या आरोग्यात शीघ्रगतीने सुधारणा व्हावी, यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
बाधित कुटुंबांप्रति सहानुभूती दर्शवल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना धन्यवाद दिले आणि जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशांतील नागरिकांचे कल्याण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि एकमेकांना आपला पाठिंबा आहे असे सांगत एकजुटीचा पुनरुच्चार केला.
पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा करताना, पंतप्रधानांनी शांतता प्रस्थापित करण्याच्या कतारच्या सकारात्मक प्रयत्नांमधील योगदानाबद्दल संतोष व्यक्त केला आणि त्यामुळे या प्रदेशात चिरस्थायी शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त केली.
उभय देशातील नेत्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांच्यात सहमत झाले.
* * *
नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2277338)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam